शहरं
Join us  
Trending Stories
1
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
2
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
3
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
4
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
5
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
6
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
7
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
8
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
9
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
10
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
11
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
12
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
13
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
14
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
15
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
16
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
17
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
18
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
19
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
20
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 

देशातील ९५ मतदारसंघांत ७० टक्क्यांनी बजावला हक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 6:27 AM

पश्चिम बंगाल व तामिळनाडूतील हिंसाचाराच्या काही घटना वगळता १२ राज्ये व एक केंद्रशासित प्रदेशातील ९५ लोकसभा मतदारसंघांत गुरुवारी शांततेत मतदान झाले.

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल व तामिळनाडूतील हिंसाचाराच्या काही घटना वगळता १२ राज्ये व एक केंद्रशासित प्रदेशातील ९५ लोकसभा मतदारसंघांत गुरुवारी शांततेत मतदान झाले. वरील दोन राज्यांत हिंसक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार, अश्रुधूर व हवेत गोळीबार करावा लागला. या मतदारसंघांत सरासरी ६९.४0 टक्के मतदान झाले.जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये १५ टक्के तर उधमपूरमध्ये ६२ टक्क्यांहून अधिक मतदान झाले. श्रीनगरमधील ईदगाह, खनयार, हब्बा कदल व बाटमालू या परिसरातील ९० केंद्रांवर एकाही मतदाराने मतदान केले नाही. तामिळनाडूमध्ये ७२ टक्के, आसाममध्ये ७३ टक्के, पश्चिम बंगालमध्ये ७५ टक्के, मणिपूरमध्ये ७४ टक्के तर छत्तीसगडमध्ये ७१ टक्के मतदान झाले. पण कर्नाटक, ओडिशा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व बिहारमध्ये मतदानाचे प्रमाण ६१ ते ६५ टक्क्यांच्या आसपासच होते.ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी काही ठिकाणी आल्याने यंत्रे बदलून देण्यात आली. दार्जिलिंगमध्ये काहींनी ईव्हीएमची नासधूस केली. तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या कार्यकर्त्यांनी बुथ बळकावल्याचा आरोप द्रमुकने केला. मात्र त्यात तथ्य नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.बंगालमधील एका बुथमध्ये मतदानास मज्जाव केल्याची तक्रार करीत लोकांनी रास्ता रोको केला. माकपचे उमेदवार मोहम्मद सलिम यांच्या वाहनावर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याची तक्रार आहे. ते वाहन नंतर जाळण्यात आले. त्यामुळे मोहम्मद सलिम यांना एका मतदान केंद्रात आसरा घ्यावा लागला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019Tamil Nadu Lok Sabha Election 2019तमिळनाडू लोकसभा निवडणूक 2019Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Jammu And Kashmir Lok Sabha Election 2019जम्मू आणि काश्मीर लोकसभा निवडणूक 2019