नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षानं दिल्लीतील रेल्वे रूळांनजीक झोपड्या तोडण्याच्या निर्णयावरुन भाजपावर निशाणा साधला आहे. या महिन्याच्या शेवटी झोपड्या हटवण्याचाी नोटीस केंद्र सरकारने जारी केल्याने तेथील लोकांच्य चिंतेत भर पडली आहे. अरविंद केजरीवाल जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत कोणीही कोणाचंही घरं तोडू शकत नाही असं आपने म्हटलं आहे. गरज भासल्यास या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातही दाद मागण्यात येणार असल्याचं देखील स्पष्ट केलं आहे.
आपचे प्रवक्ते राजीव चड्ढा यांनी याबाबत माहिती दिली आहे. दिल्लीत आयोजित करणाऱ्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी यावर भाष्य केलं आहे. "भाजपाकडून झोपड्यांवर त्या तोडण्यात येणार असल्याच्या नोटीस लावत आहे. या नोटीस माणुसकी आणि संविधानाच्या विरोधातील आहेत. जो पर्यंत अरविंद केजरीवाल जिवंत आहेत तोपर्यंत कोणाचंही घर तोडू दिलं जाणार नाही याचं आश्वासन देतो" असं राजीव यांनी म्हटलं आहे.
"गरज भासल्यास सर्वोच्च न्यायालयातही दाद मागू, रस्त्यावरही उतरण्यास तयार"
"तुमचं घर जमीनदोस्त होऊ देणार नाहीत. झोपड्यांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या रक्षणासाठी केजरीवाल कायम उभे राहतील. सध्या अशा एका योजनेवर काम सुरू आहे जी आल्यानंतर झोपड्या कोणीही पाडू शकणार नाही. दिल्लीत रेल्वे रूळांनजीक असलेल्या 48 हजार झोपड्या हटवण्याचे आदेश नुकतेच न्यायालयाने दिले होते. गरज भासल्यास सर्वोच्च न्यायालयातही दाद मागू आणि रस्त्यावरही उतरण्यास आपण तयार आहोत" असं देखील राजीव चड्ढा यांनी म्हटलं आहे.
"न्यायालयाच्या निर्णयावर राजकारण करणं बंद करावं"
दिल्ली भाजपाचे प्रवक्ते प्रवीण शंकर कपूर यांनी यानंतर आपच्या राजीव यांच्यावर हल्लाबोल केला आहे. "दिल्ली सरकारने 48 हजार झोपडपट्टीवासीयांसाठी कोणतीही न्यायालयीन लढाई लढली नाही. आता जेव्हा ते राजीव रतन आवास योजनेअंतर्गत रिकाम्या असलेल्या 50 हजारांपेक्षा अधिक घरांद्वारे झोपडपट्टीवासीयांना मदत करू शकतात, अशा परिस्थितीत राघव चड्ढा यांसारख्या नेत्यांकडून त्यांची दिशाभूल केली जात आहे. आपच्या नेत्यांनी न्यायालयाच्या निर्णयावर राजकारण करणं बंद करावं" असं प्रवीण कपूर यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
क्रूरतेचा कळस! वृद्ध काकाला भाच्याने जनावरांसोबत साखळीने बांधलं, अशी झाली अवस्था
CoronaVirus News : "कोरोना व्हायरस नष्ट झाला", भाजपा नेत्याचा अजब दावा
"उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या इतिहासातील 'अयशस्वी' मुख्यमंत्री, त्यांनी फडणवीसांकडून ट्रेनिंग घ्यावं"
"...तरीही भाजपा समर्थन करते?, हा तर महाराष्ट्रासकट श्रीरामाचाही अपमान"