शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पुन्हा एकदा ट्रम्प सरकार! कमला हॅरिस यांना पराभूत करत मिळवला दणदणीत विजय
2
भारतीय वंशाचे राजा कृष्णमूर्ती यांचा विजय, अमेरिकेच्या निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा मारली बाजी! 
3
Maharashtra Election 2024: राज ठाकरेंचा 'या' मतदारसंघातील उमेदवाराबद्दल मोठा निर्णय
4
AUS vs IND BGT : ऑस्ट्रेलियात Team India चा दारुण पराभव होणार; रिकी पाँटिंगची 'मन की बात'
5
“राहुल गांधी शहरी नक्षलवाद्यांचे समुपदेशन करण्यासाठी महाराष्ट्रात आले”: चंद्रशेखर बावनकुळे
6
"जरांगेंच्या निर्णयामुळे कार्यकर्त्यांचं नुकसान; ...आम्ही व्यवस्थित डाव मारू!"; काय म्हणाले बच्चू कडू?
7
"तुम्हा सर्वांना उडवून टाकेन..."; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने हॉस्पिटल उडवून देण्याची धमकी
8
"...तर पाय कलम करू", नितेश राणेंना मारण्याची धमकी देणाऱ्या सिद्दिकींना नारायण राणेंचे उत्तर
9
AUS vs IND : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी यजमानांची 'भारी' तयारी; क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय
10
Waaree Energies Share Price : एका आठवड्यात 'या' शेअरमध्ये ४९ टक्क्यांची वाढ, बनली १ लाख कोटींची कंपनी; गुंतवणूकदार मालामाल
11
Salman Khan : हस्ताक्षरामुळे उघड होणार सलमान खानच्या घरावरील गोळीबार आणि पत्राचं रहस्य
12
Raha Kapoor Birthday: दोन वर्षांची झाली राहा कपूर, आजी नीतू अन् आत्या रिद्धीमाने शेअर केला क्युट फोटो
13
भारत ऑस्ट्रेलियाशी टेस्ट मालिका हरला तरीही WTC Final गाठू शकतो, जाणून घ्या गणित
14
मुस्लिमांसाठी १० हजार कोटींचं बजेट; मविआच्या जाहीरनाम्यात समाजवादी पक्षाची मागणी
15
लाडक्या बहिणींना वर्षाला देणार २५००० ; अजित पवारांची घोषणा, जाहीरनाम्यात काय काय?
16
‘गुरुचरित्र’सारखा प्रभाव, दत्तात्रेयांच्या आद्य अवताराचे सार; मनोभावे स्मरण, लाभेल पुण्य!
17
Swiggy IPO गुंतवणूकीसाठी खुला, अँकर गुंतवणूकदारांकडून उभे केले ५००० कोटी; GMP काय?
18
कोण आहे अमन देवगण? 'आजाद'मधून करतोय पदार्पण, अजय देवगणसोबत आहे हे कनेक्शन
19
'अनुपमा' फेम रुपाली गांगुलीवर सावत्र मुलीचे नवे आरोप; म्हणाली, "ती माझ्या आईच्या बेडवर..."
20
सीमेवर नवी ताकद... आता भारतीय लष्कराला मेड इन इंडिया ASMI शस्त्र मिळणार!

CoronaVirus News : "केंद्र सरकार जेवढं डोकं विरोधी पक्षांच्या राज्यांविरोधात वापरतंय त्याच्या 1 टक्का यासाठी वापरलं असतं तर..."

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2021 8:46 AM

AAP Manish Sisodia Slams Modi Government : उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांनी केंद्र सरकारला सणसणीत टोला लगावला आहे. 

नवी दिल्ली - देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार माजला आहे. राजधानी दिल्लीतही कोरोना परिस्थिती गंभीर आहे. या कोरोना परिस्थितीवरून दिल्ली भाजपाचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी (Adesh Gupta) पुन्हा एकदा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधांचा हवाला देत-देत केजरीवाल सरकारने दिल्लीला कोरोनाचा मृत्यूदर प्रती 10 लाखांच्या यादीत आघाडीवर आणून ठेवला आहे. याशिवाय, अरविंद केजरीवाल यांनी कोरोनामुळे मरण पावलेल्या व्यक्तींच्या आकडेवारीमध्ये हेराफेरी केल्याचा आरोपही आदेश गुप्ता यांनी केला आहे. यानंतर आता उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांनी केंद्र सरकारला सणसणीत टोला लगावला आहे. 

मनिष सिसोदीया (AAP Manish Sisodia) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. विरोधी पक्षात असणाऱ्या राज्यांविरोधात लढण्यासाठी शक्ती वापरण्याऐवजी केंद्राने तिचा वापर कोरोनाविरुद्धच्या लढ्यात करावा असं सिसोदीया यांनी म्हटलं आहे. "केंद्र सरकार जेवढं डोकं विरोधी पक्षाची सत्ता असणाऱ्या राज्य सरकारांशी लढण्यासाठी वापरत आहे त्याच्या एक टक्का जरी कोरोनाविरुद्धच्या लढाईत किंवा लसीकरणाची व्यवस्था बसवण्यासाठी वापरलं असतं तर आज देशात हाहाकार उडाला नसता. एवढ्या जणांचा मृत्यू झाला नसता. पण ते म्हणतात ना ज्याच्या मानसिकतेमध्ये जे असतं तेच तो करतो तसा प्रकार आहे" अशा शब्दांत सिसोदीया यांनी निशाणा साधला आहे.

केजरीवाल फेरफार करण्यामध्ये पारंगत आहेत, त्यामुळे मागील वर्षाप्रमाणे यंदाही अरविंद केजरीवाल यांनी कोरोनामुळे मरण पावलेल्यांची खरी आकडेवारी लपवल्याचा आरोप आदेश गुप्ता यांनी केला आहे. याचबरोबर, ठरवा आणि निवडा या आधारावर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मरण पावलेल्या कोरोना योद्ध्यांचा सन्मान केला. मात्र दुसरीकडे शेकडो असे कोरोना योद्धे आहेत जे मुख्यमंत्र्यांकडून मदत मिळण्याची वाट पाहत आहेत. तरी मुख्यमंत्र्यांनी अशा लोकांची साधी दखलही घेतली नाही, असा आरोप आदेश गुप्ता यांनी केला आहे. एवढंच नाही तर दिल्लीमधील परिस्थिती चिंताजनक असताना अरविंद केजरीवाल यांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे. आरोग्य व्यवस्थेच्या कमतरतेमुळे दिल्लीत रुग्णांचा मृत्यू होत असतानाच दुसरीकडे केजरीवाल या परिस्थितीची जबाबदारी इतर कोणावर तरी ढकलण्याचा प्रयत्न करत होते. अन्य राज्यांच्या तुलनेत प्रती 10 लाख व्यक्तींच्या हिशोबाने दिल्लीमध्ये सर्वाधिक मृत्यू झालेत, असे आदेश गुप्ता म्हणाले.

केजरीवाल सरकार कोरोना मृतांची आकडेवारी लपवतंय, भाजपाचा आरोप

दिल्लीत केजरीवाल सरकारने पहिल्या लाटेच्यावेळी सुद्धा आकडे लपवल्याचा खेळ खेळला होता, असा आरोपही आदेश गुप्ता यांनी केला. तसेच, दुसऱ्या लाटेच्या वेळीही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मानवतेलाही लाजवेल अशी वागणूक दिल्लीकरांना देत मृतांचा खरा आकडा लपवल्याचा दावा आदेश गुप्ता यांनी केला आहे. दिल्ली सरकारच्या आकडेवारीनुसार एका दिवसात दिल्लीत 450 हून अधिक जणांचा मृत्यू झालेला नाही. तर दुसरीकडे दिल्ली महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार एका दिवसात वेगवेगळ्या स्मशानभूमींवर एका दिवसात 700 हून अधिक जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत, असे आदेश गुप्ता यांनी सांगितले.

आकडेवारी दर्शविते की 1 एप्रिल ते 17 मे दरम्यान दिल्लीतील तीन महानगरपालिकांमधील स्मशानभूमींमध्ये 16593 मृतदेहांवर अंत्यसंस्कार कोरोना विधीने करण्यात आले. केजरीवाल सरकारने या काळात केवळ 11061 मृत्यूची आकडेवारी जाहीर केली. केजरीवाल सरकारला मृतांची संख्या बदलून मृतांच्या कुटूंबाला नुकसान भरपाई देणे टाळायचे आहे का? केजरीवाल सरकारने मृतांची संख्या लपवून खोटे आरोप करण्याच्या लालसेने संवेदनशीलतेच्या कळसांवर विजय मिळविला ही बाब लाजिरवाणी आहे. या घृणास्पद कृत्याबद्दल मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांची माफी मागावी, असेही आदेश गुप्ता म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAAPआपdelhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाPoliticsराजकारण