शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
2
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
3
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
4
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट
5
'सर्वात मोठा पक्ष कोणताही असेल, मुख्यमंत्री तुम्हीच होणार'; निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदे शिवसेनेला शब्द दिलेला?
6
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
7
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
8
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
9
'पुष्पा 2'नंतर 'पुष्पा 3' येणार की नाही? अल्लू अर्जुनच्या पोस्टमधून चाहत्यांना मिळालं उत्तर
10
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
11
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
12
गुरु प्रदोष: ८ राशींना अचानक धनलाभ योग, शुभ घडेल; इच्छापूर्ती, दत्तगुरु-महादेवांची कृपा!
13
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
14
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
15
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
16
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
17
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
18
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
19
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
20
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा

'ममता बॅनर्जी केवळ ढोंग करतायेत, अचानक सुरक्षा व्यवस्था कोठे गेली होती?', काँग्रेस नेत्याचा हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 3:39 PM

adhir ranjan chaudhary attacked mamta banerjee says foot injury is just electoral hypocrisy : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर नंदीग्राममध्ये झालेल्या कथित हल्ल्याचे देशभरात पडसाद उमटत आहेत.

ठळक मुद्देपश्चिम बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी (West Bengal Election 2021) अजून काही दिवस शिल्लक आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. यातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर नंदीग्राममध्ये झालेल्या कथित हल्ल्याचे देशभरात पडसाद उमटत आहेत. या हल्ल्यावरून तृणमूल काँग्रेसने भाजपाचे षड्यंत्र असल्याचा आरोप केला आहे, तर भाजपा आणि काँग्रेसनेममता बॅनर्जी यांच्यावर झालेला हल्ला खोटा असून त्यांचा निवडणुकीच्या ड्रामा असल्याचे म्हटले आहे. (adhir ranjan chaudhary attacked mamta banerjee says foot injury is just electoral hypocrisy)

पश्चिम बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. एबीपी न्यूजशी बोलताना अधीर रंजन चौधरी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर निवडणुकीत ढोंगीपणा करत असल्याचा आरोप केला. "नंदीग्रामसह संपूर्ण बंगालमध्ये परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून ममता बॅनर्जी आता स्वत:वर हल्ला करण्याचा नाटक करून लोकांची सहानुभूती वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत", असे अधीर रंजन चौधरी यांनी म्हटले आहे.

याचबरोबर, अधीर रंजन चौधरी यांनी ममता बॅनर्जी टीका करत याप्रकरणाची चौकशी सीबीआय, सीआयडी किंवा इतर कोणत्याही एजन्सीमार्फत करावी, असे म्हटले आहे. तसेच, मुख्यमंत्र्यांची संपूर्ण सुरक्षा व्यवस्था अचानक कोठे गेली होती? असा सवाल उपस्थित करत संपूर्ण भागात सीसीटीव्ही आहेत, जेव्हा चौकशी केली जाईल, तेव्हा 'दूध का दूध और पानी का पानी' होईल, असे अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले. याशिवाय, थोडी फार जखम कोणालाही चालता-फिरता होते, ममता बॅनर्जी फक्त ढोंग करत आहेत, असेही अधीर रंजन चौधरी म्हणाले.

दरम्यान, सध्या ममता बॅनर्जी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ममता बॅनर्जी  यांच्या पायाचा एक्सरे काढण्यात आला असून त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याने प्लॅस्टर घालण्यात आल्याचे एसएसकेएम हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले आहे. तर, ममता बॅनर्जी यांचे भाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी ममता बॅनर्जी यांचा रुग्णालयामधील फोटो ट्विट करत भाजपाला इशारा दिला आहे. भाजपाने तयार रहावे. रविवारी 2 मे रोजी त्यांना बंगालच्या लोकांची ताकद दिसणार आहे. तयार राहा, असे त्यांनी म्हटले आहे. 

( ममता बॅनर्जींच्या पायाला प्लॅस्टर; हल्ल्याप्रकरणी TMC निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार )

ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला कसा झाला?या निवडणुकीच्या रणधुमाळीत बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काल नंदीग्राम मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरला. यानंतर ममता बॅनर्जी नंदीग्राम येथे एका मंदिरात पूजेसाठी गेल्या होत्या. मंदिरातून बाहेर परतल्यानंतर त्या गाडीत बसण्यासाठी जात होत्या. यावेळी त्या गाडीत शिरत नाही, तोवर चार-पाच लोकांनी जोरात गाडीचा दरवाजा ढकलला. यावेळी, ममता बॅनर्जी यांना गंभीर दुखापत झाली. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांच्या डाव्या पायाला प्लॅस्टर करण्यात आले आहे.

पश्चिम बंगालची निवडणूक हायव्होल्टेज ठरणार दरम्यान, देशात पाच राज्यांत विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. परंतू सर्वात हायव्होल्टेज निवडणूक ही पश्चिम बंगालची ठरणार आहे. याठिकाणी भाजपाला काहीही करून पश्चिम बंगालची सत्ता मिळवायची आहे, तर तृणमूल काँग्रेसला काहीही करून सत्ता टिकवायची आहे. यासाठी दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीcongressकाँग्रेसtmcठाणे महापालिकाWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Politicsराजकारण