Petrol Diesel Price: “वर्षभरात ६९ वेळा पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले, मोदी सरकारने कमावले ४.९१ लाख कोटी”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 11:10 PM2021-07-10T23:10:45+5:302021-07-10T23:14:00+5:30

Petrol Diesel Price: काँग्रेसने केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला असून, वर्षभरात ६९ वेळा पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले असून, करातून मोदी सरकारने तब्बल ४.९१ लाख कोटी कमावले, असा दावाही काँग्रेसने केला आहे.

adhir ranjan chowdhury says modi govt hikes petrol and diesel price 69 times in this year | Petrol Diesel Price: “वर्षभरात ६९ वेळा पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले, मोदी सरकारने कमावले ४.९१ लाख कोटी”

Petrol Diesel Price: “वर्षभरात ६९ वेळा पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले, मोदी सरकारने कमावले ४.९१ लाख कोटी”

Next
ठळक मुद्देकाँग्रेसची मोदी सरकारवर टीकाइंधनदरवाढीतून ४.९१ लाख कोटी कमावल्याचा दावाअधीर रंजन चौधरी यांनी साधला निशाणा

नवी दिल्ली: गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत आहे. इंधनदरवाढ कमी होण्याची शक्यता धूसर असल्याचे तज्ज्ञांचे मत असून, यामुळे सामान्य जनतेला मोठा त्रास सहन करावे लागत आहे. भाजीपालासह दूधाचे दरही वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसने केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला असून, वर्षभरात ६९ वेळा पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले असून, करातून मोदी सरकारने तब्बल ४.९१ लाख कोटी कमावले, असा दावाही काँग्रेसने केला आहे. (congress adhir ranjan chowdhury says modi govt hikes petrol and diesel price 69 times in this year)

यावर्षीच्या १ जानेवारीपासून केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत ६९ वेळा वाढ करण्यात आली असून, त्यातून मिळणाऱ्या करातून केंद्राने ४.९१ लाख कोटी कमावले, असा दावा काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी केला आहे. तसेच पश्चिम बंगालमधीलममता बॅनर्जी सरकारने छत्तीसगडच्या धर्तीवर कर कमी करून सामान्य जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणीही अधीर रंजन चौधरी यांनी केली आहे. 

देशभरातील १७ राज्यांमध्ये पेट्रोल ₹ १०० पार; ‘या’ शहरात सर्वाधिक इंधनदर

केंद्रातील मोदी सरकारचा जनतेशी काही संबंध नाही

केंद्रातील मोदी सरकारला सामान्य जनतेशी काही घेणे-देणे नाही. तसेच सर्वसामान्यांच्या दुःखांबाबत भाजप सरकारला अजिबात चिंता नाही. देशभरातील अनेक ठिकाणी पेट्रोलचे दर १०० रुपयांवर गेले आहेत. डिझेलचे दर शंभरीच्या उंबरठ्यावर आहेत. एवढेच नव्हे, तर एलपीजी सिलेंडरचे दरही ८५० रुपयांवर गेले आहेत. यामुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे, अशी टीका अधीर रंजन चौधरी यांनी केली आहे. 

कोरोनाची लस घेतल्यानंतर सेक्सपासून दूर राहा; ‘या’ देशाचा नागरिकांना सल्ला

सत्तेत आल्यापासून २५ लाख कोटी कमावले

२०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेत आल्यापासून त्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवून तब्बल २५ लाख कोटी रुपये कमावले, असा दावा करत, अलीकडेच छत्तीसगड सरकारने व्हॅटमध्ये १२ रुपयांची कपात केली, त्यानंतर पेट्रोलचे दर १२ रुपयांनी स्वस्त झाले, असे ते म्हणाले. 

“भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांनाच आता कॅबिनेट मंत्री बनवले”

दरम्यान, शनिवारीही पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ करण्यात आली. यानंतर दिल्लीमधील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती अनुक्रमे १००.९१ रुपये आणि ८९.८८ रुपये इतक्या झाल्या आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत देखील पेट्रोल शंभरीपार असून प्रतिलिटर १०६ रुपये ९३ पैसे तर डिझेल प्रतिलिटर ९७ रुपये ४६ पैसे इतकी किंमत झाली आहे. दुसरीकडे कोलकात्यामध्ये हेच दर अनुक्रमे १०१.०१ रुपये आणि ९२.९७ रुपये तर भोपाळमध्ये ते १०९.२४ रुपये आणि ९८.६७ रुपये इतके नोंदवण्यात आले आहेत.
 

Web Title: adhir ranjan chowdhury says modi govt hikes petrol and diesel price 69 times in this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.