PM Narendra Modi Speech in Lok Sabha: अधीर रंजन जी, आता अती होतयं, मी तुमचा...; नरेंद्र मोदींनी भर लोकसभेत सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 05:29 PM2021-02-10T17:29:59+5:302021-02-10T17:40:00+5:30
PM Narendra Modi Speech in Lok Sabha: राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लोकसभेतील चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर दिले. यावेळी त्यांनी कोरोनावरही भाष्य केले. शेतकरी आंदोलन आणि कृषी कायद्यांवर मोदी बोलताना विरोधकांनी मोठा गदारोळ केला.
PM Narendra Modi Speech in Lok Sabha: पंतप्रधान नरेंद्र मोदी कृषी कायद्यांवर बोलत असताना विरोधकांनी गदाऱोळ करण्यास सुरुवात केली. यावेळी काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी मोदींच्या भाषणावेळी मध्ये मध्येच बोलायला सुरुवात केली. यावर मोदींनी भाषण थांबविले आणि खाली बसले. लोकसभा अध्यक्षांनी चौधरींना समजावल्यानंतर मोदी पुन्हा उभे राहिले. (PM Narendra modi angry on Congress MP Adhir Ranjan Chaudhari)
मात्र, पुन्हा बोलू लागताच चौधरींनी पुन्हा बोलण्यास सुरुवात केली. यावर मोदींनी तुमचे म्हणजे रजिस्टर करण्याची संधी मिळाली आहे. तुम्हाला आणखी काही बोलायचेय का असे विचारले. यावर चौधरी यांनी माईक बंद केलाय मग कसे बोलणार अशी तक्रार केली. यावर साऱ्या सभागृहात हशा पिकला. यानंतर पुन्हा मोदींनी बोलण्यास सुरुवात करताच चौधरींनी त्यांना पुन्हा थांबविण्यास सुरुवात केली. हे पाहून मोदी संतापले.
अधीर रंजन जी आता अती होत आहे. मी तुमचा आदर करतो. तुम्हाला बंगालमध्ये तृणमूलपेक्षा जास्त प्रसिद्धी नक्की मिळेल, काळजी करू नका. हे चांगले दिसत नाहीय. तुम्ही असे कधी वागत नाही, आता का वागताय, असा सवाल केला. तसेच राज्यसभेत काँग्रेसचे काय वेगळेच चाललेय आणि लोकसभेत काही वेगळेच अशा शब्दांत मोदींनी काँग्रेसची खिल्ली उडविली.
सरकारांनी संवेदनशील असायला हवे, जनतेने कधीच काही मागितले नाही. जुनाट व्यवस्था बदलल्या नाहीत तर देश कसा चालेल. आपण त्यांना द्यायला हवे असे मोदी म्हणाले. कृषी कायदे कुणालाही बंधनकारक नाही, पर्याय आहेत... जिथे पर्याय आहेत, तिथे विरोधाचं काय कारण? जिथे फायदा होईल, तिकडे शेतकऱ्याने जावे असे कायद्यामध्ये आहे, असे मोदी म्हणाले.
Adhir Ranjan ji, ab zyada ho raha hai. I respect you. You will get more publicity than TMC in Bengal. Don't worry...This doesn't look good, why are you doing this?: PM Narendra Modi in Lok Sabha as Leader of Congress in the House Adhir Ranjan Chowdhury interjects pic.twitter.com/kB7OEncEdF
— ANI (@ANI) February 10, 2021
कोरोना काळात आपण स्वत:बरोबरच जगालाही सावरले. हा भारतासाठी टर्निंग पॉईंंट आहे. राष्ट्रपतींच्या भाषणातील प्रत्येक शब्द प्रेरणादायी होता. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाचा दरवाजा आपण वाजवत आहोत. हा मोठा क्षण आहे. महिला खासदारांनी मोठ्या संख्येने चर्चेत सहभाग घेतला, त्याचे आभार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले.