मुंबई - गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. विशेषकरून भाजपामधून मोठ्या प्रमाणावर नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येत आहेत. काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधल्यानंतर आता भाजपाला सोडचिठ्ठी देणारे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार जयसिंगराव गायकवाड हे आता राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे.जयसिंगराव गायकवाड हे उद्या मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपाच्या नेतृत्वावर नाराज असलेल्या जयसिंगराव गायवाड यांनी काही दिवसांपूर्वी भाजपाला सोडचिठ्ठी दिल्ली होती. त्यांनी भजपच्या प्रदेश कार्यसमिती सदस्यत्वाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला होता. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने जयसिंगराव नाराज होते. भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर, ते पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधणार असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू होती.. उमेदवारी अर्ज मागेगायकवाड सध्या भाजपच्या प्रदेश कार्यसमितीचे सदस्य होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते सक्रिय राजकारणातून बाजूला फेकले गेले होते. आता होऊ घातलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून शिरीष बोराळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे नाराज जयसिंगराव गायकवाड यांनी मराठवाडा विभागातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आज अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असताना त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. मात्र, त्यासोबतच भाजपाला रामरामही ठोकला. दरम्यान, महाविकास आघाडीमुळे ही निवडणूक भाजपला अवघड जाण्याची शक्यता आहे.गोपीनाथ मुंडेंचे निकटवर्तीयजयसिंगराव गायकवाड हे भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन आणि गोपिनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय होते. मराठवाड्यात भाजपच्या विस्तारासाठी त्यांनी मोठे काम केले आहे. मध्यंतरी पंकजा मुंडे यांचे नाराजी नाट्य घडले. तेव्हा, गोपिनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जात असतानाही जयसिंगराव यांनी कुठल्याही प्रकारची भूमिका घेतली नव्हती. त्यामुळे आता पंकजा मुंडे जयसिंग रावांच्या या भूमिकेवर नेमकी काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष होते. जयसिंगरावांनी आपल्या कारकिर्दीत, माजी केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री, माजी सहकार राज्यमंत्री, दोन वेळा माजी मराठवाडा पदवीधर आमदार, तसेच तीन वेळा बीड जिल्ह्याचे खासदार, अशी अनेक पदे आजवर उपभोगली आहेत. ते भाजपा किसान मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीसही होते. गायकवाड यांनी आपल्या राजीनाम्याची माहिती फेसबुकवरीही दिली आहे. त्यांनी आपल्या फेसबुकवरही राजीनाम्याची कॉपी शेअर केली आहे. यानंतर त्यांच्या या निर्णयावर विविध प्रकारच्या प्रतिक्रियाही यायला सुरुवात झाली आहे.
भाजपाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता आणखी एक बडा नेता हाती बांधणार घड्याळ
By बाळकृष्ण परब | Published: November 23, 2020 1:12 PM
Maharashtra Politics News : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. विशेषकरून भाजपामधून मोठ्या प्रमाणावर नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येत आहेत.
ठळक मुद्देभाजपाला सोडचिठ्ठी देणारे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार जयसिंगराव गायकवाड हे आता राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहेजयसिंगराव गायकवाड हे उद्या मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेतभाजपाच्या नेतृत्वावर नाराज असलेल्या जयसिंगराव गायवाड यांनी काही दिवसांपूर्वी भाजपाला सोडचिठ्ठी दिल्ली होती