पंजाबनंतर आता राजस्थानमध्ये मोठा निर्णय घेण्याची काँग्रेसची तयारी, गहलोत-पायलट वाद मिटणार? की...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 03:53 PM2021-07-20T15:53:54+5:302021-07-20T15:54:59+5:30

Gehlot vs Pilot : राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गहलोत विरुद्ध सचिन पायलट असा वाद सुरू आहे. मात्र हायकमांडने मनावर घेतल्याने आता हा वाद संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत.

After Punjab, now Congress is ready to take a big decision in Rajasthan, will the Gehlot-Pilot dispute end? Of ... | पंजाबनंतर आता राजस्थानमध्ये मोठा निर्णय घेण्याची काँग्रेसची तयारी, गहलोत-पायलट वाद मिटणार? की...

पंजाबनंतर आता राजस्थानमध्ये मोठा निर्णय घेण्याची काँग्रेसची तयारी, गहलोत-पायलट वाद मिटणार? की...

Next

नवी दिल्ली - अनेक मतभेदांनंतर पंजाबमधील कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यातील वाद संपुष्टात आणण्यात काँग्रेसच्या हायकमांडने यश मिळवले आहेत. (Congress Politics)त्यानंतर आता गेल्या वर्ष दीड वर्षापासून राजस्थानकाँग्रेसमध्ये धुमसत असलेला वाद मिटवण्यासाठी काँग्रेस हायकमांडने निर्णायक पाऊल उचलण्याची तयारी केली आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गहलोत विरुद्ध सचिन पायलट असा वाद सुरू आहे. (Gehlot vs Pilot) मात्र हायकमांडने मनावर घेतल्याने आता हा वाद संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. (After Punjab, now Congress is ready to take a big decision in Rajasthan, will the Gehlot-Pilot dispute end?)

काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या राजस्थानमध्ये मुख्यमंत्री बदलण्याचा पक्षश्रेष्ठींचा कुठलाही विचार नाही. म्हणजेच अशोक गहलोत हे मु्ख्यमंत्रिपदी कायम राहतीत. एआयसीसीच्या संघटनेत बदल होतील. त्याच प्रक्रियेंतर्गत सचिन पायलट यांना राष्ट्रीय सरचिटणीस बनवले जाऊ शकते. तसेच त्यांच्याकडे राजस्थानचा प्रभार दिला जाऊ शकतो. याशिवाय राजस्थानमधील मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून, त्यामध्ये सचिन पायलट यांच्या मर्जीतील आमदारांना मंत्रिपद मिळू शकते. मात्र सचिन पायलट यांचे किती समर्थक मंत्री बनणार हे मात्र अद्याप निश्चित झालेले नाही.

मात्र सचिन पायलट यांच्या समर्थकांना योग्य प्रतिनिधित्व देण्यात येईल. पक्षाच्या हायकमांचे मत आहे की, बोर्ड आणि महापालिकांमध्ये पायलट आणि गहलोत गटांना महत्त्व देण्याऐवजी पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना यामध्ये स्थान दिले पाहिजे. सध्या या बदलासह पक्षाला एकजूट करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.

दरम्यान, राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी पंजाबमध्ये कॅप्टन आणि सिद्धू यांच्यात झालेला वाद मिटवण्यात काँग्रेस हायकमांडची खूप मदत केली होती. प्रशांत किशोर हे आधीपासूनच कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे राजकीय सल्लागार म्हणून काम करत आहेत. आता राजस्थानमधील अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वादामध्येसुद्धा ते काही तोडगा काढू शकतात.

दरम्यान, पंजाब काँग्रेसमधील वाद संपुष्टात आल्यानंतर आता काँग्रेसने आपले संपूर्ण लक्ष राजस्थानवर केंद्रित केले आहे. काँग्रेस आता राजस्थानमधील वाद अधिक लांबवू इच्छित नाही. त्यामुळे दोन्ही गटांना मान्य होईल असा काही मध्यममार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच या माध्यमातून दोन्ही गटांनाही फायदा पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

राजस्थानमध्ये गेल्या वर्षभरापासून अशोक गहलोत विरुद्ध सचिन पायलट यांच्यात वाद सुरू आहे. त्यामुळे गतवर्षी राजस्थानमधील काँग्रेस सरकारसमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र अशोक गहलोत यांनी सर्व अनुभव पणाला लावत या संकटावर मात केली होती. तर सचिन पायलट आणि त्यांच्या समर्थकांची झोळी रिकामीच राहिली होती. तेव्हापासून राज्यातील राजकीय नियुक्त्या आणि मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला आहे.  

Web Title: After Punjab, now Congress is ready to take a big decision in Rajasthan, will the Gehlot-Pilot dispute end? Of ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.