“सत्ता आली नसती तर तुम्ही आला नसतात का?; हा तुमच्या आयुष्यातील शेवटचा पक्ष, लक्षात ठेवा”

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 05:31 PM2021-03-16T17:31:03+5:302021-03-16T17:33:43+5:30

पक्ष सोडला तर जनता धडा शिकवते हे अकोले तालुक्याने दाखवून दिले आहे. तुम्ही पुन्हा पक्ष प्रवेश करुन चुक केली नाही असे तुम्हाला वाटणार नाही.

Ahmadnagar Poltical Happenings: NCP Jayant Patil Welcome BJP Sitaram Gaikar in Party | “सत्ता आली नसती तर तुम्ही आला नसतात का?; हा तुमच्या आयुष्यातील शेवटचा पक्ष, लक्षात ठेवा”

“सत्ता आली नसती तर तुम्ही आला नसतात का?; हा तुमच्या आयुष्यातील शेवटचा पक्ष, लक्षात ठेवा”

googlenewsNext
ठळक मुद्देराष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम करणार आहे तुमची सर्व कामे मार्गी लावेन असा शब्द देत  पालकमंत्री आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्वांचे स्वागत केलेशरद पवार या हिमालयाकडे बघून तुम्ही राष्ट्रवादीचे लोक निवडून दिलेत. त्यामुळे ५४ आमदार आले

मुंबई – अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला धक्का दिला आहे. मधुकर पिचड समर्थकांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आहे, विधानसभा निवडणुकीपूर्वी वैभव पिचड आणि मधुकर पिचड यांनी भाजपात प्रवेश केला होता, त्यावेळी या कार्यकर्त्यांनीही भाजपात प्रवेश घेतला, परंतु आता पुन्हा या कार्यकर्त्यांनी घरवापसी केली आहे. यावेळी बोलतना जयंत पाटील यांनी हा तुमच्या आयुष्यातील शेवटचा पक्ष हे ध्यानात ठेवा असा सूचक दमच भरला.

यावेळी जयंत पाटील म्हणाले की, आम्ही सगळे जिवाभावाचे काम करणारे लोक आहोत. पवारसाहेबांविषयी लोकांच्या मनात अतोनात प्रेम आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा अनेकजण व्यक्त करत आहेत. त्यामुळे आम्ही पुन्हा ताकदीने पक्ष उभा करतोय. सीताराम गायकर पक्षातून गेले होते असं कधी जाणवलं नाही. आज आनंद झाला आहे. मालकीच्या घरात आलात अशा अविर्भावात प्रवेश केला आहात. पिचड यांनी पक्ष सोडला त्यामुळे आम्हाला नवा कार्यकर्ता मिळाला आणि किरण लहामटे निवडून आले असं त्यांनी सांगितले.

तसेच शरद पवार या हिमालयाकडे बघून तुम्ही राष्ट्रवादीचे लोक निवडून दिलेत. त्यामुळे ५४ आमदार आले. सत्ता आली नसती तर तुम्ही आला नसतात का? असा सवाल जयंत पाटील यांनी करताच एकच हशा पिकला. कारण लोक सत्ता नव्हती त्यावेळी थांबतही नव्हते याची आठवणही जयंत पाटील यांनी सांगितली. पश्चिम घाट योजनेचा फायदा अकोलेला होणार आहे. बंधारे बांधण्याचे काम करत आहोत. भाजपच्या काळात आंदोलन करुनही कामे झाली नाहीत ती कामे किरण लहामटे आमदार झाल्यावर करत आहेत. आपल्या घरात आला आहात. गायकर यांनी जिल्हा बँकेवर काम केले आहे. त्यामुळे तालुका मर्यादित न रहाता जिल्हाकडेही त्यांनी लक्ष द्यावे अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

भाजपाला दे धक्का! पिचडांचे खंदे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल; अजित पवारांची खेळी यशस्वी

हा तुमच्या आयुष्यातील शेवटचा पक्ष

नगर जिल्हयात कॅनालची भरपाई खूप दिली आहे. आता अकोले विकासासाठी कटिबद्ध आहोतच परंतु नगर जिल्हाही महत्वाचा आहे. नगर जिल्हयात आता ताकद आणखी वाढणार आहे. हा तुमच्या आयुष्यातील शेवटचा पक्ष आहे लक्षात ठेवा, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम करणार आहे असं जयंत पाटील म्हणाले तर आपल्यातील जीवाभावाचा नेता येतोय त्यामुळे आनंद वाटला आहे.त्यांच्या पाठिशी ताकदीने उभा राहण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. पक्ष सोडला तर जनता धडा शिकवते हे अकोले तालुक्याने दाखवून दिले आहे. तुम्ही पुन्हा पक्ष प्रवेश करुन चुक केली नाही असे तुम्हाला वाटणार नाही. तुमची सर्व कामे मार्गी लावेन असा शब्द देत  पालकमंत्री आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्वांचे स्वागत केले. सीताराम गायकर यांच्या नेतृत्वाखाली १२ संचालकांनी आणि अकोले तालुक्यातील सहकार क्षेत्रातील ७२ दिग्गज पदाधिकाऱ्यांनी यावेळी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला.   

 

Web Title: Ahmadnagar Poltical Happenings: NCP Jayant Patil Welcome BJP Sitaram Gaikar in Party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.