Ajit Pawar: अजित पवारांनी पुण्यात पुष्पगुच्छ नाकारला, साताऱ्यात स्वीकारला; पण... कार्य़कर्त्याला सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 07:59 PM2021-05-28T19:59:24+5:302021-05-28T20:17:42+5:30
Ajit Pawar, Rajesh Tope in Satara: उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमीच त्यांच्या रोखठोक शैलीसाठी चर्चेत असतात. कोरोना काळात स्वयंशिस्तीचे दर्शन घडवितानाच अजितदादा कधी कधी नियमांचे पालन न करणाऱ्या कार्यकर्त्यांना चारचौघात चार खडे बोल सुनावण्यात देखील मागे पुढे पाहत नाही असेेही अनेकवेळा घडले आहे.
पुण्यातील कोरोना आणि अन्य विभागांच्या बैठका संपवून उपमुख्यंमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) हे साताऱ्यात दाखल झाले. गाडीतून उतरताच अजित पवार यांनी त्यांच्या स्वागतासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना सुनावल्याचा प्रकार घडला आहे. गेल्याच आठवड्यात पुण्याच्या विधान भवनात पुष्पगुच्छ घेऊन आलेल्या कार्यकर्त्याला अजित पवारांनी झापले होते. (Ajit Pawar refused in Pune, accepted a bookey in Satara from NCP workers.)
Maratha Reservation: 9 दिवसांत खूप काही होऊ शकते; संभाजी राजे, मराठा आरक्षणावर अजित पवारांचे संकेत
उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमीच त्यांच्या रोखठोक शैलीसाठी चर्चेत असतात. कोरोना काळात स्वयंशिस्तीचे दर्शन घडवितानाच अजितदादा कधी कधी नियमांचे पालन न करणाऱ्या कार्यकर्त्यांना चारचौघात चार खडे बोल सुनावण्यात देखील मागे पुढे पाहत नाही असेेही अनेकवेळा घडले आहे. पुण्यात एक कार्यकर्ता दादांना म्हणाला, दादा, तुम्हाला पुष्पगुच्छ द्यायचा आहे. त्यावर अजित पवार म्हणाले, आरे बाबा, काही तरी नियम पाळा, कोणाकडून पुष्पगुच्छ आणला. त्याला कोरोना झाला असेल किंवा नाय काय माहिती? पण जरा काळजी घ्या...असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. त्यानंतर अजित पवार बैठकीसाठी मार्गस्थ झाले.
पुण्यातला व्हिडीओ...
आरे बाबा काही तरी नियम पाळा, कोणाकडून गुच्छ आणला. त्याला कोरोना झाला असेल नाय, काय माहिती.. pic.twitter.com/7U0KQ9zM4Y
— Lokmat (@MiLOKMAT) May 21, 2021
साताऱ्यात पुष्पगुच्छ स्वीकारला, पण...
अजित पवार यांनी साताऱ्यात कार्यकर्त्यांकडून पुष्पगुच्छ स्वीकारला आहे. परंतू त्यांनी कोरोनाचे काहीतरी नियम पाळा, मग म्हणाल अजित दादा पुष्पगुच्छ स्वीकारत नाही, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली. तसेच दोन-तीन कार्यकर्त्यांकडून त्यांनी बुके स्वीकारताना त्यांना लांब राहण्याचा सल्ला दिला. अजित पवार आणि टोपे हे साताऱ्यात संध्याकाळी दाखल झाले. साताऱ्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सध्या बंद दाराआड अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरु आहे.
कार्यकर्त्यांची झाडाझडती..
बुके घेऊन स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलीच झाडाझडती घेतली. तुमचं राष्ट्रवादीवर प्रेम आहे पवार साहेबांच्यावर प्रेम आहे, असू द्या पण कोरोना आहे हे पण लक्षात ठेवा. बुके वगैरे बाजूला ठेवा, असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना झाडले.