अजित पवार कार्यक्षम, तर मग निर्णय का होत नाहीत-चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 06:44 PM2021-05-14T18:44:42+5:302021-05-14T18:46:56+5:30
Politics : अजित पवार हे कार्यक्षम, झटपट निर्णय घेतात. मग मराठा समाजाच्या इतर मागासांच्या सवलती अजूनही का जाहीर होत नाहीत, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.
कोल्हापूर : अजित पवार हे कार्यक्षम, झटपट निर्णय घेतात. मग मराठा समाजाच्या इतर मागासांच्या सवलती अजूनही का जाहीर होत नाहीत, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.
मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानतानाच पाटील यांनी पवारांना चिमटा काढला आहे. केंद्र सरकारने दाखल केलेल्या याचिकेमुळे या प्रकरणामध्ये समाजाला थोडा दिलासा मिळाला आहे. आता राज्य सरकारनेही तातडीने अशीच याचिका दाखल करावी.
अजित पवार हे कार्यक्षम, डायनॅमिक मंत्री आहेत. आमदारांचा एक कोटीचा निधी कोरोनासाठी देण्याचा निर्णय त्यांनी बैठकीतच घेतला आणि रात्रीच शासन आदेश निघाला. मग वडेट्टीवार यांच्याकडून सारथी काढून घेऊन पवार यांनी त्यामध्ये नवीन काय केले. त्याही पुढे जावून आण्णासाहेब पाटील महामंडळ नियोजनकडे घेतलं. त्याबाबतीत तरी त्यांनी कुठला निर्णय घेतला. उलट हे महामंडळ स्वायत्त होते. १४ हजार तरुणांना कर्जे दिली गेली. आता ते ह्यनियोजनह्णच्या ताब्यात जावून त्यांचे सरकारीकरण झाले आहे, असे पाटील म्हणाले.