Ajit Pawar: अजित पवार, हसन मुश्रीफांची जबाबदारी वाढली; दिलीप वळसे पाटलांकडे गृहमंत्रीपद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 07:55 PM2021-04-05T19:55:19+5:302021-04-05T19:58:40+5:30
Dilip Walse Patil new Home minister Of Maharashtra: राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन दिल्ली गाठलेली असताना इकडे राज्याचे नवे गृहमंत्री होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकारावा असे विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिले आहे.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी (Anil Deshmukh) उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राजीनामा दिल्याने सांयकाळी नव्या गृहमंत्र्यांच्या नावाचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackreay) दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्याकडे देण्यात यावा असे म्हटले आहे. यामुळे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्यावरील जबाबदारी वाढली आहे. (Dilip Walse Patil's Labour department charge is being given to Hasan Mushrif as additional charge and state Excise Department will be looked after by Deputy CM Ajit Pawar: Maharashtra CMO)
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन दिल्ली गाठलेली असताना इकडे राज्याचे नवे गृहमंत्री होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकारावा असे विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिले आहे. या पत्रात दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात यावा; तसेच कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ यांच्याकडे देण्यात यावा अशी विनंती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat singh koshyari) यांना पाठविलेल्या पत्रात करण्यात आली आहे.
CM Uddhav Thackeray forwards Maharashtra Home Minister Anil Deshmukh's (file pic 1) resignation to Governor, also informs that Dilip Walse Patil (file pic 2) will have charge of Home department now: Maharashtra Chief Minister's Office (CMO) pic.twitter.com/4qykxQsJAy
— ANI (@ANI) April 5, 2021
राज्यातील गृहमंत्रीपद रिकामे झाले आहे. हे मंत्रिपद राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेले आहे. अशातच राष्ट्रवादीमध्ये चार जणांची नावे या पदासाठी चर्चेत होती. यात शरद पवारांचे विश्वासू प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राजेश टोपे यांची नावं आघाडीवर होती. त्याचसोबत कामगार मंत्री आणि माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटीलही यांचेही नाव चर्चेत होते.
उच्च न्यायालयाने माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगांच्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिल्याने पदाचा राजीनामा देऊन अनिल देशमुख दिल्लीला गेले आहेत. अशातच शिवसेनेचे मंत्री आणि मातोश्रीचे विश्वासू नेते एकनाथ शिंदे हे काही वेळापूर्वी शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहोचले होते. शरद पवारांचा संदेश त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पोहोचविला होता.