परत जायला तुम्हाला बोलवलं कुणी होतं?, अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

By मोरेश्वर येरम | Published: December 26, 2020 12:26 PM2020-12-26T12:26:43+5:302020-12-26T12:28:44+5:30

चंद्रकांत पाटील यांना २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरऐवजी पुण्यातून तिकीट देण्यात आलं होतं.

ajit Pawar slams bjps Chandrakant Patil on his going back to kolhapur statement | परत जायला तुम्हाला बोलवलं कुणी होतं?, अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

परत जायला तुम्हाला बोलवलं कुणी होतं?, अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

Next
ठळक मुद्देअजित पवारांनी घेतला चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचारआमदार म्हणून निवडून दिलं तर जनतेची आधी काम करा, अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना सल्लाकोल्हापुरात परत जाणार असल्याचं केलं होतं चंद्रकांत पाटील यांनी विधान

पुणे
"कोल्हापुरात परत जायला तुम्हाला पुण्यात बोलवलंच कुणी होतं?", असं म्हणत अजित पवार यांनी आपल्या खास अंदाजात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. ते पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलत होते. 

कोल्हापुरात परत जाण्याची तयारी असल्याचं विधान चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या एका कार्यक्रमात केलं होतं. चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचा अजित पवार यांनी शेलक्या शब्दांत समाचार घेतला. "एक जण म्हणतो पुन्हा येईन, दुसरा म्हणजे परत जाईन. एकाला पुन्हा येईन काही जमलं नाही. आता हे म्हणतायत परत जाईन. अरे तुम्हाला पुण्यात बोलवलं कुणी होतं?", असं अजित पवार म्हणाले. 

चंद्रकांत पाटील यांना २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरऐवजी पुण्यातून तिकीट देण्यात आलं होतं. त्यामुळे स्थानिक भाजप उमेदवार मेधा कुलकर्णी नाराज झाल्याचीही चर्चा त्यावेळी झाली होती. यावरही अजित पवार यांनी भाष्य केलं. 

"तुम्ही इथे आलात आणि आमदार झालात. तुमच्यामुळे इथल्या आमच्या भगिनी मेधा कुलकर्णी नाराज झाल्या. जनतेने निवडून दिलंय सेवा करायला आणि तुम्ही परत जायची भाषा करता. मग इथं आलातच कशाला?", असा सवाल उपस्थित करत अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 
 

Web Title: ajit Pawar slams bjps Chandrakant Patil on his going back to kolhapur statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.