Ajit Pawar: कोणालातरी काटा काढायचाय; अजित पवारांवरील 'ईडी' कारवाईवरून राजू शेट्टींचा गंभीर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 09:43 AM2021-07-02T09:43:57+5:302021-07-02T09:44:30+5:30

Ajit Pawar ED action: महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने (ED) गुरुवारी मोठी कारवाई केली. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar)यांच्या नातेवाईकांचा साताऱ्यातील जरंडेश्वर कारखान्यावर जप्त करण्यात आला आहे. यावर राजू शेट्टींनी प्रतिक्रिया दिली आहे.

Ajit Pawar: Someone wants to remove the thorn; Raju Shetty's serious allegation against 'ED' action against Ajit Pawar | Ajit Pawar: कोणालातरी काटा काढायचाय; अजित पवारांवरील 'ईडी' कारवाईवरून राजू शेट्टींचा गंभीर आरोप 

Ajit Pawar: कोणालातरी काटा काढायचाय; अजित पवारांवरील 'ईडी' कारवाईवरून राजू शेट्टींचा गंभीर आरोप 

googlenewsNext

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने (ED) गुरुवारी मोठी कारवाई केली. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar)यांच्या नातेवाईकांचा साताऱ्यातील जरंडेश्वर कारखान्यावर जप्त करण्यात आला आहे. यावर माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju shetty) यांनी ईडीवर गंभीर आरोप केले आहेत. (Raju shetty allegation on ED; ED saized Ajit pawar's close aide jarandeshwar sugar factory)

मी अनेक दिवसांपासून सांगतोय, की सीबीआय, ईडी या केंद्राच्या हातात आहेत. त्याचा वापर राजकीय ब्लॅकमेलिंगसाठी केला जातोय. एक नाही ४३ कारखान्यांवर कारवाई व्हायला हवी. या कारखान्यांच्या विक्रीची चौकशी झालीच पाहिजे. राजकीय फायद्यासाठी एखाद्या कारखान्याची चौकशी लावायची आणि त्यांना भाजपात घ्यायचे, ही पद्धत चुकीची आहे. कारण हे कारखाने शेतकऱ्यांचे आहेत, असा आरोप राजू शेट्टी यांनी केला.  

सर्वपक्षीय नेत्यांनी मिळून साखर कारखान्यांवर दरोडा टाकलाय. ईडीकडे ५ वर्षे फेऱ्या मारल्या. ४३ कारखान्यांची यादी हवी तर पुन्हा देतो. ईडी ही राजकीय दृष्ट्या काम करत आहे. अनेकदा मी ईडीकडे खेटे घातले. पाच वर्षांपूर्वी पुरावे दिले होते. आता ही कारवाई करण्याचा अर्थ ईडीला कोणीतरी सांगतोय, अमूक अमूक माणूस त्रासदायक ठरतोय, म्हणून त्याचा काटा काढायचाय, असा आरोप राजू शेट्टी यांनी केला. 

सहकारी होते तेव्हा हे कारखाने तोट्यात होते, खासगी झाल्यावर ते फाय़द्याच चालू लागले आहे. याचा अर्थ काहीतरी गौडबंगाल आहे. राज्यातील सर्वच पक्षातील नेत्यांनी साखर कारखाने विकत घेतले आहेत. सर्व कारखान्यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. 

Web Title: Ajit Pawar: Someone wants to remove the thorn; Raju Shetty's serious allegation against 'ED' action against Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.