जय पवार की अजित पवार, बारामतीतून कोण लढणार? प्रदेशाध्यक्षांनी गोंधळ संपवला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 04:52 PM2024-10-01T16:52:05+5:302024-10-01T16:52:05+5:30

Maharashtra Elections : विधानसभा निवडणुकीत सगळ्यांचे लक्ष बारामती विधानसभा मतदारसंघावर असणार आहे. बारामतीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून युगेंद्र पवार लढणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही याबद्दल भूमिका स्पष्ट केली आहे. 

ajit pawar will contest from Baramati assembly not jay pawar say sunil tatkare | जय पवार की अजित पवार, बारामतीतून कोण लढणार? प्रदेशाध्यक्षांनी गोंधळ संपवला

जय पवार की अजित पवार, बारामतीतून कोण लढणार? प्रदेशाध्यक्षांनी गोंधळ संपवला

Ajit Pawar Baramati Vidhan Sabha : लोकसभा निवडणुकीत बारामतीत पवार विरुद्ध पवार असा संघर्ष बघायला मिळाला होता. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने दुसऱ्यांदा पवार विरुद्ध पवार राजकीय संघर्ष होणार, हे निश्चित मानले जात आहे. लोकसभा निवडणुकीपासूनच युगेंद्र पवार विधानसभेची तयारी करत आहेत. पण, अजित पवारांनी वेगवेगळी विधाने केल्याने आणि जय पवारांच्या भेटीगाठी वाढल्याने बारामतीतूनअजित पवार स्वतः लढणार की मुलगा जय पवार हे निवडणुकीच्या मैदानात उतरणार, याबद्दलच्या चर्चा होत आहेत. या चर्चांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पूर्णविराम दिला. (sunil tatkare clarify that, Ajit Pawar will be contest election from Baramati assembly)

'लोकमत'शी बोलताना सुनील तटकरे यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून कोण लढणार? या प्रश्नाभोवती फेर धरलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला. 

सुनील तटकरे काय म्हणाले?

"लोकसभा निवडणुकीवेळी ज्या प्रमाणात आमची मते भाजपाला पडायला हवी होती, ती पडली नाहीत; हे खरं आहे. पण, आम्ही महायुती म्हणून काम करत आहोत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीला तसे होणार नाही. यावेली वेगळा निकाल दिसेल", असा दावा त्यांनी केला. 

अजित पवार बारामतीतून लढणार की नाही, या गोंधळाबद्दल ते म्हणाले की, "अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातूनच लढणार आहेत."

अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार

लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत झाली होती. शरद पवारांच्या कन्या विरुद्ध अजित पवारांच्या पत्नी असा हा राजकीय संघर्ष होता. पण, विधानसभा निवडणुकीत काका विरुद्ध पुतण्या असा राजकीय लढाई दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. 

युगेंद्र पवार हे अजित पवारांचे सख्खे पुतणे आहेत. त्यांच्या उमेदवारीबद्दल खुद्द पार्थ पवारही बोलले आहेत. युगेंद्र पवार बारामती विधानसभा मतदारसंघ पिंजून काढताना दिसत आहे. अजित पवारांनीही जन सन्मान यात्रेच्या माध्यमातून दोन वेळा बारामती लोकसभा मतदारसंघात शक्तिप्रदर्शन केले आहे. त्यामुळे या मतदारसंघातील निकाल निर्णायक असणार आहे. 

Web Title: ajit pawar will contest from Baramati assembly not jay pawar say sunil tatkare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.