"अजित पवारांची दादागिरी नही चलेगी नही चलेगी", आव्हाडांकडून गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2024 04:07 PM2024-11-10T16:07:14+5:302024-11-10T16:08:06+5:30
Jitendra Awhad Ajit Pawar: अजित पवार लोकांशी बोलत असल्याचा एक व्हिडीओ जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केला आहे. त्यांनी दादागिरी चालणार नाही असा इशारा दिला आहे.
Jitendra Awhad Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीमुळे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर चांगलेच लक्ष ठेवून असल्याचे दिसत आहे. एकमेकांना कोंडीत पकडण्याचेही प्रयत्न होत आहेत. अशात जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कारखान्यातील असल्याचा दावा जितेंद्र आव्हाडांनी सूत्रांच्या हवाल्याने केला आहे. या व्हिडीओत अजित पवारांनी काय म्हटलं आहे, त्याचा संवादही आव्हाडांनी पोस्ट केला आहे.
व्हिडीओत अजित पवार काय म्हणाले आहेत?
जितेंद्र आव्हाडांनी शेअर केलेल्या या व्हिडीओत अजित पवार समोर बसलेल्या लोकांशी बोलत असल्याचे दिसत आहे. सदर व्हिडिओ श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कारखान्यातील असल्याची सूत्रांची माहिती आहे, असे आव्हाडांनी स्पष्ट केले आहे.
अजित पवार - मला तुमची साथ हवी आहे. कुणाच्या दबावाला घाबरायची गरज नाही. आधी रामराजे यांचं ऐकलं आता माझं ऐकावं अशी विनंती आहे. इथं जरी कुणाचंही युनिट असलं तरी पुढं चालवायचं की नाय चालवायचं ह्याबाबत मी बरंच काही करू शकतो.... बोला... दबाव आहे का तुमच्यावर?
कामगार- तुमच्या सहकार्याने आणि मदतीने बंद असलेला साखर कारखाना त्यांनी सूरू केला.
अजित पवार - हे साफ चुकीचं आहे. धारुला नीट विचारा कुणी काय मदत केली ते. तिकडं सगळी सुत्र आम्ही हलवली. मला बरंच काही करता आलं असतं. कुणी म्हणत होतं धारूने नाही अजित पवारने कारखाना घेतला. शेजारी असणारा शरयू कारखाना माझ्या बंधूने घेतला... त्यावेळीं ह्या कारखान्याबाबत माझ्याकडे सुद्धा ऑफर आली होती. त्यावेळी सगळं काही झालं होतं परंतु माझ्या माळेगाव आणि सोमेश्वर कारखान्याच याच परिसरात युनिट असल्यामुळे मी काही केलं नाही. परंतु आता मी जर काही गंमत करायची ठरवली तर खूप काही करू शकतो. परत तुम्ही रडत माझ्याकडे याल... चूक झाली आमचा गैरसमज झाला म्हणून... मी एकतर कुणाच्या नादाला लागत नाही. तुम्हाला कुणालातरी मतदान करायचं आहे. कदाचित तुम्हाला काही वाटत असेल तर ठिक आहे. मला तर माझी जागा निवडून आणायची आहे. त्यासाठी जिवाचं रान करायचं आहे. परंतु नंतर अशी वेळ येईल की त्यावेळी तुमच्या डोळ्यात पाणी येईल तुम्ही काहीच करू शकणार नाही. मग मी धारूच सुद्धा ऐकणार नाही.
*अजित पवारांची
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 10, 2024
दादागिरी नही चलेगी नही चलेगी
*(सदर व्हिडिओ श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कारखान्यातील असल्याची सूत्रांची माहिती)*
मला तुमची साथ हवी आहे. कुणाच्या दबावाला घाबरायची गरज नाही. आधी रामराजे यांचं ऐकलं आता माझं ऐकावं अशी विनंती आहे. *इथ जरी कुणाचही युनिट असलं… pic.twitter.com/8oUK3MZQOv
असा व्हिडीओतील संवादही जितेंद्र आव्हाडांनी पोस्ट केला आहे. नव्या व्हिडीओमुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवारांना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस केला जाऊ शकतो.