स्थानिक पातळीवर शिवसेनेशी जुळवून घ्या, अजित पवारांचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2020 01:35 AM2020-12-24T01:35:24+5:302020-12-24T07:05:37+5:30
Ajit Pawar : दौंडमधील भाजप, रासपाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. पवार म्हणाले, स्थानिक पातळीवर शिवसेना, राष्ट्रवादीत खटके उडत असल्याच्या बातम्या येतात.
मुंबई : ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुरू होत आहेत. आपल्याला आता शिवसेनेसोबत कायम राहायचे आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर वाद-विवाद बंद झाले पाहिजेत. शिवसेनेसोबत स्थानिक पातळीवर जुळवून घ्या, असे आदेश उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बुधवारी कार्यकर्त्यांना दिले.
दौंडमधील भाजप, रासपाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. पवार म्हणाले, स्थानिक पातळीवर शिवसेना, राष्ट्रवादीत खटके उडत असल्याच्या बातम्या येतात. महाविकास आघाडी मजबूतपणे काम करत आहे. आपल्याला दीर्घकाळ शिवसेनेसोबत राहायचे आहे. त्यांच्यासोबत जुळवून घेण्याची सवय करावी लागेल. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप यांनी मुंबई पालिका स्वतंत्रपणे लढण्याचे मत मांडले. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे सेनेसोबत जुळवून घेण्याचे विधान चर्चेचा विषय बनले आहे.