नवी दिल्ली : कृषी कायद्यांमध्ये केलेल्या सुधारणांमुळे शेतकऱ्यांना अनेक नव्या संधींची दारे खुली झाली असून त्यांना आणखी अधिकारही मिळाले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमात सांगितले.
नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचे सध्या दिल्ली परिसरात उग्र आंदोलन सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी सांगितले की, शेतमाल विकत घेतल्यानंतर तीन आठवड्यांच्या आत त्याचे पैसे शेतकऱ्याला देणे नव्या कृषी कायद्यांद्वारे बंधनकारक आहे. पैसे मिळाले नाहीत तर शेतकऱ्याने केलेल्या तक्रारीचा उपविभागीय दंडाधिकाऱ्याने एक महिन्याच्या आत निपटारा करणे बंधनकारक करण्यात आले. मोदी म्हणाले, महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील शेतकरी जितेंद्र भोई यांनी आपल्या शेतातील मका व्यापाऱ्यांना ३ लाख ३२ हजार रुपयांना विकला होती. त्या व्यवहारात व्यापाऱ्यांनी २५ हजार रुपये आगाऊ दिले व बाकीची रक्कम १५ दिवसांत देण्याचे आश्वासन दिले.
चोरून नेलेली मूर्ती कॅनडातून आणणार भारतातसुमारे १०० वर्षांपूर्वी वाराणसी येथून चोरलेली अन्नपूर्णा देवीची मूर्ती तस्करीतून कॅनडात नेण्यात आली होती. आता ही मूर्ती तिथून लवकरच भारतात आणली जाणार आहे. नुकताच जागतिक वारसा सप्ताह पाळण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर ही घटना प्रत्येक भारतीयाला आनंद देणारी आहे. सुमारे १०० वर्षांपूर्वी वाराणसी येथून चोरलेली अन्नपूर्णा देवीची मूर्ती तस्करीतून कॅनडात नेण्यात आली होती. आता ही मूर्ती तिथून लवकरच भारतात आणली जाणार आहे. नुकताच जागतिक वारसा सप्ताह पाळण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर ही घटना प्रत्येक भारतीयाला आनंद देणारी आहे.