‘अमित शहा आमदार खरेदी यादी’ काँग्रेसने सादर केली आकडेवारी; भाजपावर घोडेबाजारीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 11:01 AM2020-07-26T11:01:03+5:302020-07-26T11:06:00+5:30

काँग्रेसने ट्विटरवर म्हटलं आहे की, भाजपाकडे घोडेबाजारी करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध आहे पण सामान्य लोकांना कोविड १९ च्या संकटातून वाचवण्यासाठी निधी उपलब्ध नाही असं सांगत त्यांनी एक फोटो अपलोड केला आहे.

‘Amit Shah MLA Shopping List’ Statistics presented by Congress; BJP accused of horse-trading | ‘अमित शहा आमदार खरेदी यादी’ काँग्रेसने सादर केली आकडेवारी; भाजपावर घोडेबाजारीचा आरोप

‘अमित शहा आमदार खरेदी यादी’ काँग्रेसने सादर केली आकडेवारी; भाजपावर घोडेबाजारीचा आरोप

Next
ठळक मुद्देभाजपाकडे घोडेबाजारी करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध आहेसत्तेच्या भुकेपोटी भाजपा देशातील लोकशाही परंपरेचा अपमान करत आहेट्विटरवरुन काँग्रेसने साधला भाजपावर निशाणा

 नवी दिल्ली – राजस्थानमध्ये सुरु असलेल्या सत्तासंघर्षावर काँग्रेसने पुन्हा एकदा भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपाकडून घोडेबाजारी होत असून आमदारांना खरेदी करण्यासाठी कोट्यवधीच्या ऑफर दिल्या जात आहेत, याबाबत काँग्रेस नेत्यांनी काही फोनवरील ऑडीओ क्लीपही पुरावा म्हणून दाखवल्या. त्यानंतर आता काँग्रेसने ट्विटर अकाऊंटवरुन भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहांवर आमदार खरेदीचा आरोप करत त्यांना टोला लगावला आहे.

काँग्रेसने ट्विटरवर म्हटलं आहे की, भाजपाकडे घोडेबाजारी करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध आहे पण सामान्य लोकांना कोविड १९ च्या संकटातून वाचवण्यासाठी निधी उपलब्ध नाही असं सांगत त्यांनी एक फोटो अपलोड केला आहे. यात केंद्रीय मंत्री अमित शहा यांना लक्ष्य करण्यात आलं आहे. Amit Shah’s MLA Shopping List असं लिहिलं असून त्यात मध्य प्रदेश – २२, कर्नाटक -१६, गोवा – १३, मणिपूर ८, आसाम – ९ अशा विरोधी पक्षातून घेतलेल्या आमदारांची आकडेवारी सांगण्यात आली आहे.

तसेच सत्तेच्या भुकेपोटी भाजपा देशातील लोकशाही परंपरेचा अपमान करत आहे, आमदार खरेदी करणे, सरकार पाडणे हा भाजपाचा स्वभाव बनला आहे. लोकशाहीच्या हत्येचा हा खेळ जास्त दिवस चालणार नाही. अरुणाचल प्रदेश, गोवा, मणिपूर येथे हॉर्स ट्रेडिंग, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र येथे लोकशाहीचा अपमान, तर गुजरात, राजस्थानमध्ये घोडेबाजाराचा प्रयत्न अशा शब्दात काँग्रेसने केंद्रीय मंत्री अमित शहांवर निशाणा साधला आहे.

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार भाजपाकडून पाडण्यात आलं, ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपात प्रवेश देऊन त्यांच्या समर्थक आमदारांना काँग्रेसविरोधात बंडखोरी करण्यास भाग पाडले, त्यानंतर मध्य प्रदेशात काँग्रेस सरकार कोसळून भाजपा सरकार स्थापन झालं, त्यानंतर आता राजस्थानात काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांना हाताशी धरुन भाजपा राजस्थानात काँग्रेसचं सरकार पाडण्याचा प्रयत्न करतंय असा आरोप केला जात आहे.

काँग्रेस आमदारांना २०-३० कोटींची ऑफर देण्यात येत आहे, तत्कालीन उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी काँग्रेसच्या आमदारांना खरेदी करण्यासाठी ऑफर दिल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यानंतर सचिन पायलट आणि समर्थक आमदारांच्या बळावर राजस्थानात सरकार पाडून भाजपाचं सरकार आणण्याचा डाव आखला जात आहेत असा आरोप काँग्रेसने केला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान झाल्यानंतर महाराष्ट्राकडे भाजपा मोर्चा वळवणार असल्याचीही चर्चा सुरु आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

“ज्याची कुवत सगळ्यात कमी लेखली गेली तोच पक्षाचा सर्वोच्च नेता अन् राज्याचा मुख्यमंत्री झाला”

तुकाराम मुंढेंना 'फुल सपोर्ट'; उद्धव ठाकरेंची 'जन की बात'

मी कोणाच्या उज्ज्वल भवितव्याच्या आड येत नाही, पण...; उद्धव ठाकरेंचा नेम अजित पवारांवर?

"अयोध्येला जाणार, राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार!" पण...

Web Title: ‘Amit Shah MLA Shopping List’ Statistics presented by Congress; BJP accused of horse-trading

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.