शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

"अमित शाहांनी, एवढं तरी खरं बोलावं", मुश्रीफ प्रकरणावरून सुप्रिया सुळे संतापल्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 12:52 PM

Supriya Sule Amit Shah : कोल्हापूर दौऱ्यात अमित शाह यांनी हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. या भेटीवरून आता सुप्रिया सुळे यांनी अमित शाहांना घेरले. 

Supriya Sule Maharashtra Politics : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांच्या भेटीचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. याच भेटीवरून आता सुप्रिया सुळेंनीअमित शाह आणि हसन मुश्रीफ यांच्यावर टीकेची तोफ डागली. त्या मुंबईत माध्यमांशी बोलत होत्या. (Supriya Sule demanded that Amit Shah should say that the allegations leveled against Hasan Mushrif were false)

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "किरीट सोमय्या अनेक वर्षांपासून एक मोठे फायटर आहेत. डर्टी डझन नावाची सीरिज त्यांनीच काढली. मी कधीच विसरले नाही. डर्टी डझन कुठे आहेत, हा एक मोठाच प्रश्न आहे. काल मी त्या डर्टी डझनपैकी एका माणसाचा फोटो अमित शाहांसोबत बघितला."

मुश्रीफ-शाह भेटीवर सुप्रिया सुळे काय बोलल्या?

"ज्यांना एका वर्षापूर्वी हे डर्टी डझन म्हणत होते, तेच डर्टी डझन अतिशय विनम्रपणे अमित शाहांना भेटले. मला कौतुक दोघांचंही वाटतं. अमित शाहांचंही वाटतं, कारण त्यांचा पक्ष त्यांना (हसन मुश्रीफ) डर्टी डझनपैकी एक म्हणत होता. मला गंमत त्या माणसाचीही वाटते, ज्याच्या बायकोला लढावं लागलं. त्यांच्या नातवडांना दूध मिळत नव्हतं. त्यांची बायको लढत होती. ज्यांनी ईडी तुमच्या घरी पाठवली. ते (हसन मुश्रीफ) त्यांना (अमित शाह) अभिवादन करत होते", अशी टीका सुप्रिया सुळे यांनी हसन मुश्रीफांवर केली. 

सुप्रिया सुळे या भेटीवर बोलताना म्हणाल्या, "दोघांची विश्वासार्हता इथे पणाला लागली आहे. अमित शाहांना मला प्रश्न विचारायचा आहे की, ज्या माणसाच्या घरी तुम्ही ईडी पाठवली. ज्या माणसावर तुम्ही ईडी आणि सीबीआयच्या केसेस केल्या. त्या माणसाला डर्टी डझन तुमचा पक्ष म्हणत होता. मग तुम्ही त्याला हॅण्डशेक केलाच कसा?", असा सवाल सुप्रिया सुळेंनी अमित शाह यांना केला. 

अमित शाहांनी टीव्हीवर सांगावं की मुश्रीफांवरील आरोप खोटा होता -सुप्रिया सुळे

"ती फाईल क्लिअर आहे का, मग भाजपाने आणि अमित शाहांनी टीव्हीवर येऊन सांगितले पाहिजे की, हो, मी जो हसन मुश्रीफांवर आरोप केला; तो खोटा होता. एवढं तरी त्यांनी (अमित शाह) खरं बोलावं. आणि हसन मुश्रीफांनीही त्यांना शेकहॅण्ड करताना आम्हाला सांगावं की, हो, हे अमित शाह आहेत. त्यांनी माझी माफी मागितली आहे. माझ्या घरावर हल्ला केला, माझ्या नातवंडांना दूध दिलं नाही. माझ्या बायकोच्या अश्रुंची किंमत अमित शाहांनी आमच्या घरात येऊन फेडली म्हणून मी त्यांना हॅण्डशेक करतोय", असे म्हणत सुप्रिया सुळेंनी हसन मुश्रीफांना लक्ष्य केले. 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेAmit Shahअमित शाहHasan Mushrifहसन मुश्रीफmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपा