शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

अमित ठाकरे आदित्य ठाकरेंच्या पावलावर पाऊल टाकण्याच्या तयारीत; मनसेत मिळणार मोठी जबाबदारी?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 10:25 AM

मनसेचे नेते अमित ठाकरे मुंबईहून नाशिकला रवाना; मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिकमध्ये

मुंबई/नाशिक: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे नाशिकला रवाना झाले आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरेंनी त्यांना तातडीनं नाशिकला बोलावल्याची माहिती मिळत आहे. राज ठाकरे पुत्र अमित ठाकरेंवर लवकरच मोठी जबाबदारी सोपवणार असल्याची शक्यता आहे. त्यासाठीच त्यांना नाशिकमध्ये बोलावण्यात आलं आहे. महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी राज ठाकरे सध्या नाशकात आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी कालच शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिरोडकर यांच्या मनगटावर शिवबंधन बांधून त्यांचं पक्षात स्वागत केलं. त्यानंतर आता शिरोडकर यांच्याकडे असलेली जबाबदारी अमित ठाकरेंना मिळणार असल्याची चर्चा आहे. तसा आग्रह पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी राज ठाकरेंकडे धरला आहे. अमित ठाकरे पक्षाचा युवा चेहरा असल्यानं त्यांच्याकडे विद्यार्थी सेनेची जबाबदारी सोपवण्यात यावी, अशी मागणी पक्षातील नेत्यांची आहे. त्यामुळे विद्यार्थी सेनेची जबाबदारी अमित ठाकरेंना दिली जाऊ शकते.

अमित ठाकरेंचं आदित्य ठाकरेंच्या पावलावर पाऊल?सध्या पर्यावरण मंत्री म्हणून काम करत असलेल्या आदित्य ठाकरेंनी २०१२ मध्ये राजकारणात प्रवेश केला. 'उद्धव आणि आदित्यला मी तुमच्या हवाली करत आहे. त्यांची काळजी घ्या', असं भावुक आवाहन करत बाळासाहेब ठाकरेंनी आदित्य यांच्या राजकारणातील प्रवेशाची घोषणा केली होती. राजकारणात सक्रिय झाल्यानंतर आदित्य यांनी युवासेनेची जबाबदारी स्वीकारली. विद्यापीठातील निवडणुका, विद्यार्थ्यांचे प्रश्न याकडे त्यांनी सर्वप्रथम लक्ष घातलं. आता राज यांनी अमित ठाकरेंकडे मनविसेची जबाबदारी दिल्यास ते आदित्य यांच्या पावलावर पाऊल टाकतील. 

आदित्य शिरोडकर यांचा शिवसेनेत प्रवेशमहाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी कालच शिवसेनेत प्रवेश केला. राज यांचे खास मित्र आणि भागीदार राजन शिरोडकर यांचे पुत्र असलेले आदित्य यांनी सेनेत प्रवेश केल्यानं मनसेला धक्का बसला आहे. राजन शिरोडकर यांच्याकडे मनसेची आर्थिक सूत्रं होती. आदित्य यांनी पक्षाची संघटनात्मक जबाबदारी अनेक वर्षे सांभाळली. २०१४ मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली. आदित्य यांनी मनसेला रामराम केल्यानं आता विद्यार्थी सेनेचं अध्यक्षपद रिक्त आहे. ती जबाबदारी अमित यांना मिळाल्यास विद्यार्थी सेनेची नव्यानं बांधणी करण्याचं आव्हान त्यांच्यासमोर असेल.

टॅग्स :Amit Thackerayअमित ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे