मुंबई - प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके सापडल्याप्रकरणी तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर एपीआय सचिन वाझे (Sachin Vaze) यांना एनआयएने अटक केली आहे. सचिन वाझे यांना शनिवारी रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी अटक केल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली आहे. अटकेपूर्वी 13 तास सचिन वाझेंची एनआयएकडून चौकशी करण्यात आली. यानंतर आता भाजपा आक्रमक झाला असून त्यांनी ठाकरे सरकार निशाणा साधला आहे. याच दरम्यान आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांनीही या प्रकरणात उडी घेत ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
अमृता फडणवीस यांनी सचिन वाझे अटक प्रकरणावरून ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. महाराष्ट्र सरकार कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार करत आहे असा गंभीर आरोप देखील अमृता यांनी केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "एकीकडे नागपूरसारख्या शहरामध्य कोरोनाबाधित रुग्णांना दाखल करण्यासाठी रुग्णालयांमध्ये जागा मिळत नाही आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकार कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार करत आहे. उद्योगपतींना घाबरवून त्यांच्याकडून वसुली करण्यासाठी सरकार आपल्या काही खास पंटराकडून योजना आखत आहे" असं अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
"सचिन वाझेंची ताबडतोब नार्को टेस्ट करा, शिवसेना आणि महाराष्ट्र सरकारचा खरा चेहरा समोर येईल"
सचिन वाझे यांची ताबडतोब नार्को टेस्ट केली जावी, अशी मागणी भाजपाचे नेते राम कदम (Ram Kadam) यांनी केली आहे. राम कदम यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला असून आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट केले आहेत. "अनिल देशमुखजी सचिन वाझे यांची ताबडतोब नार्को टेस्ट करा. होऊन जाऊ दे दूध का दूध पाणी का पाणी" असं कदम यांनी म्हटलं आहे. तसेच "अशी कोणती नावं आहेत ज्यांना महाराष्ट्र सरकार वाचवू पाहत आहे?, नार्को टेस्ट करण्यात यावी जेणेकरून शिवसेना आणि महाराष्ट्र सरकारचा खरा चेहरा लोकांसमोर येईल" असं देखील त्यांनी म्हटलं आहे.