शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
2
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
3
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
4
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
5
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
6
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
7
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
8
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
9
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
10
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
11
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
12
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
13
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
14
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
15
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
16
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
17
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
18
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक
19
...तर ५० उमेदवार उभे केले असते, समाजाचे योगदान वाया जाऊ देणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक भाष्य
20
शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे, पण..; दीपक केसरकरांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 

"हे पवार साहेबांचं सरकार हाय,  तुमच्या बापाच्यानं पडणार नाय’’, आनंद शिंदेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 7:47 AM

Devendra Fadnavis News : सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, सरकारला जागा दाखवून देण्याची पहिली संधी मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघाला आहे, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सत्ताबदलाच्या चर्चेला पुन्हा एकदा हवा दिली होती.

पंढरपूर - पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी सध्या प्रचार शिगेला पोहोचला आहे. (pandharpur mangalwedha vidhan sabha by election) राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी येथील भाजपा उमेदवार समाधान अवताडे यांचा प्रचार करताना सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, सरकारला जागा दाखवून देण्याची पहिली संधी मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघाला आहे, असे सांगत राज्यातील सत्ताबदलाच्या चर्चेला पुन्हा एकदा हवा दिली होती. आता गायक आनंद शिंदे (Anand Shinde) यांनी देवेंद्र फडणवीस यांना नाव न घेता प्रत्युत्तर दिले आहे. (Anand Shinde's reply to Devendra Fadnavis, Says, This is Pawar's government. It will not fall easily )

मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार भगिरथ भालके यांच्या प्रचारासाठी आलेल्या आनंद शिंदे यांनी गाण्याच्या माध्यमातून मतदारांना राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचाही त्यांनी खरमरीत शब्दात समाचार घेतला. ’’हे पवार साहेबांचं सरकार हाय,  तुमच्या बापाच्यानं पडणार नाय’’, असा टोला आनंद शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता लगावला. 

एका मतदारसंघाच्या निवडणुकीने काय फरक पडणार आहे, त्याने काय सरकार बदलणार आहे का, असे अनेकांना वाटत असेल. पण, सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, सरकारला जागा दाखवून देण्याची पहिली संधी मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघाला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मंगळवेढा तालुक्यातील बोराळे,नंदेश्वर, डोंगरगाव व मंगळवेढा येथे भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ आले असता त्यांनी हे विधान केले होते. दरम्यान, सत्ता बदलाचं आम्ही त्यांच्यावरच सोडलंय आम्ही. पण, त्यांनी पंढरपूरात जाऊन हे विधान केल्यामुळे प्रत्यक्ष विठोबा-माऊलीसुद्धा अत्यंत सावध झाली असेल. पण, विठु-माऊलीचा आशीर्वाद आमच्यासोबत आहे. विरोधी पक्षाला अशी भाषणं करावीच लागतात. यापूर्वी आम्हीही अशी भाषणं केलेली आहेत, लोकांमध्ये उत्साह आणण्यासाठी, त्यांचे आमदार एकत्र ठेवण्यासाठी देवेंद्र फडणवीस तसे भाषण करत असतील, असे संजय राऊत यांनी म्हटलंय. या काळात सरकार पडणार, सरकार पाडणार, सरकार अस्थिर करणार हे, जेव्हा ते पाडतील तेव्हा त्यांचं अभिनंदन करू, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliticsराजकारणBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसpandharpur-acपंढरपूरPandharpur By Electionपंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक निकाल 2021