शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

Anil Deshmukh resigned: शिवसेना झाली, राष्ट्रवादी झाली...आता काँग्रेसला तिसऱ्या विकेटची संधी द्या!; भाजपाचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2021 4:20 PM

Politics After Anil Deshmukh Resigns: राज्यातील विधानसभा निवडणूक झाल्यावर भाजपाला सत्तेतपासून लांब ठेवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले होते. तेव्हा सत्तेचा किमान समान कार्यक्रम ठरविण्यात साधारण महिना लागला होता.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यालर मोठी आव्हानात्मक वेळ आली आहे. सव्वा महिन्याच्या अंतराने दोन मंत्र्यांना राजीनामा (two ministers  resign) द्यावा लागला आहे. यावरून भाजपाचे नेते आणि प्रवक्ते केशव उपाध्येंनी महाविकास आघाडी सरकारला जोरदार टोला लगावला आहे. (Now As per common minimum program, Give opportunity to Congress: Keshav Upadhye)

शिवसेना (Shivsena)झाली, राष्ट्रवादी (NCP) झाली आता राज्यातील महाआघाडी सरकारमधील  किमान समान कार्यक्रम म्हणून काँग्रेसला देखील तिसऱ्या विकेटसाठी संधी मिळायला हवी. काँग्रेसवर अन्याय होता कामा नये..., असे ट्विट केशव उपाध्ये यांनी केले आहे. 

राज्यातील विधानसभा निवडणूक झाल्यावर भाजपाला सत्तेतपासून लांब ठेवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले होते. तेव्हा सत्तेचा किमान समान कार्यक्रम ठरविण्यात साधारण महिना लागला होता. आता गेल्या दोन महिन्यांत पुजा चव्हाण प्रकरणी शिवसेनेचे तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तर आज मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगांनी टाकलेल्या 100 कोटींच्या वसुलीच्या लेटर बॉम्बमुळे गृहमंत्री अनिल देशमुखांना (Anil Deshmukh Resigne) राजीनामा द्यावा लागला आहे. यावरून भाजपाने निशाना साधला आहे. महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षांचे झाले आता काँग्रेसला संधी द्यावी असा टोला भाजपाने लगावला आहे. 

आजच्या घडामोडीमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर १०० कोटींच्या वसुलीचे आरोप केले होते, या आरोपामुळे अनिल देशमुखांना खुर्चीवरून पायउतार व्हावं लागलं आहे, अनिल देशमुखांच्या चौकशीसाठी ठाकरे सरकारनं माजी न्यायमूर्तींची कमिटी स्थापन केली होती, परंतु या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करत हायकोर्टात सामाजिक कार्यकर्त्या जयश्री पाटील यांनी याचिका दाखल केली.

या याचिकेवर सुनावणीवेळी हायकोर्टाने या आरोपाचा तपास सीबीआयकडे सोपवला, त्यामुळे राज्यातील गृहमंत्र्यांविरोधात विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता, यानंतर राजकीय घडामोडींमध्ये अनिल देशमुखांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटून राजीनामा देण्याची तयारी दर्शवली, पवारांचा ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. मात्र आता गृहमंत्री पदाचा कारभार कोणाकडे सोपवणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यात शरद पवारांचे विश्वासू प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राजेश टोपे यांची नावं आघाडीवर आहेत. 

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rathodसंजय राठोडShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाParam Bir Singhपरम बीर सिंग