शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

Narayan Rane: राणेंच्या अटकेसाठी परब यांचा दबाव! राज्यभरात काेंबड्या उडवून सेनेचा राणेंवर प्रहार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 9:13 AM

Narayan Rane: शिवसेना-भाजपची जुंपली; राणेंच्या वक्तव्याचे राज्यभरात पडसाद;  जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यामागे एका राजकीय नेत्याचा दबाव आहे, असे विधान आमदार प्रसाद लाड यांनी केल्यानंतर पालकमंत्री अनिल परब यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात ते एका पोलीस अधिकाऱ्याला बळाचा वापर करून अटक करण्याची सूचना देत आहेत. या व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मंगळवारी रत्नागिरीत जिल्हा नियोजन समितीची सभा होती. त्या सभेनंतर पत्रकार परिषद सुरू होण्याआधी पालकमंत्री अनिल परब यांचे दोन फोनवर संभाषण झाले. तो व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.

मुंबईतून आंदोलनाची सुरुवातनारायण राणे यांचे निवासस्थान असलेल्या मुंबईतील जुहू येथील बंगल्याबाहेर युवासेनेने एकत्र येत आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी युवा सैनिकांनी राणेंच्या जुहू येथील बंगल्याबाहेर जोरदार घोषणाबाजी करत बंगल्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राणेसमर्थक आणि युवासैनिक समोरासमोर आल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला होता. यावेळी पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले. अनेक ठिकाणी शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते आमने - सामने आले व दगडफेकही झाली. यामुळे पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. याप्रकरणी नाशिकमध्ये साेमवारी मध्यरात्री राणेंविरुद्ध पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्यभरात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले असून, राणेंच्या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळात कसे सहकारी निवडले आहेत याची छोटीशी चुणूक राणेंच्या वक्तव्यावरुन देशाला व महाराष्ट्राला मिळालेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपाचा वैयक्तिक राग असेल, पण त्यांच्याबद्दल अशा प्रकारची भाषा वापरणे महाराष्ट्र कधीच मान्य करणार नाही.    - जयंत पाटील,     प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी

कोंबड्या उडवून खिल्लीमराठवाड्यातील आठही जिल्ह्यात राणे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करण्यात आला. औरंगाबाद येथे आ. अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. उस्मानाबादमध्ये शिवसैनिकांनी कोंबड्या उडवून राणे यांची खिल्ली उडवणाऱ्या घोषणा देण्यात आल्या. हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन करत प्रेतयात्रा काढून घोषणाबाजी करण्यात आली.

कोंबड्या आणि मांजरीमुख्यमंत्र्यांचा अवमान झाला म्हणून शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यालयात कोंबड्या सोडल्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या दारात मांजर सोडले. याच्या जोडीला दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी असंसदीय घोषणांची राळ उडवत आंदोलने करत दिवसभर धुळवड खेळली. पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राणे व भाजपाच्या नावाने घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

टॅग्स :Anil Parabअनिल परबNarayan Raneनारायण राणे Policeपोलिस