राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारात राष्ट्रध्वजाचा झालेला अपमान पाहून देश दु:खी झाला, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज 'मन की बात'मध्ये म्हटलं. मोदींच्या या वक्तव्यावर शेतकरी आंदोलनातील प्रमुख नेते राकेश टिकैत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
"देशाचा राष्ट्रध्वज हा फक्त पंतप्रधानांचा आहे का? संपूर्ण देशाचं राष्ट्रध्वजावर प्रेम आहे. ज्यानं देशाच्या ध्वजाचा अपमान केला आहे. त्याला अटक करा", असं राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे. नव्या कृषी कायद्यांसंदर्भात सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये पुन्हा चर्चेला सुरुवात होणार का? याबाबत विचारलं असता टिकैत यांनी बंदुकीच्या धाकाखाली चर्चा होणं शक्य नाही असं म्हटलं आहे.
...अन् 'त्या' घटनेनं वातावरण बदललं; ट्रॅक्टर घेऊन रातोरात शेकडो शेतकरी दिल्लीच्या वेशीवर
२६ जानेवारी रोजी दिल्लीत शेतकरी आंदोलकांनी भव्य ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन केलं होतं. रॅलीला हिंसक वळण मिळाल्यामुळे दिल्लीत प्रजासत्ताक दिनी मोठा तणाव निर्माण झाला होता. आंदोलक शेतकऱ्यांना थेट लाल किल्ल्यावर जाऊन धुडगूस घातला होता. यात आंदोलकांनी लाल किल्ल्यावर निशाण साहिब झेंडा फडकवला होता. त्याच ठिकाणी दरवर्षी देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते झेंडावंदन केलं जातं. मात्र यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झेंडावंदन कार्यक्रमाची जागा बदलण्यात आली होती.
सरकारी नोकरीवर लाथ ते ४४ वेळा जेलवारी; मोदी सरकारला जेरीस आणणारे राकेश टिकैत कोण आहेत?
दिल्लीत झालेल्या हिंसाचारावर केंद्र सरकारकडून आतापर्यंत कोणतंही अधिकृत वक्तव्य जाहीर करण्यात आलं नव्हतं. पंतप्रधान मोदी देखील यावर मौन बाळगून होते. पण आज 'मन की बात'मध्ये पंतप्रधानांनी २६ जानेवारीच्या घटनेवर भाष्य केलं. प्रजासत्ताक दिनी देशाच्या राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्याचं पाहून देश दु:खी झाला, असं मोदी म्हणाले.
वचन देतो! मोदी सरकारची मान जगासमोर झुकू देणार नाही; राकेश टिकैत यांचे भावनिक आवाहन
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आम्ही सन्मान करतो. शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर आम्ही त्यांच्याकडून तोडगा काढण्याची अपेक्षा करतो. पण आमच्यावर दबावाचं राजकारण करुन आम्ही चर्चेला तयार होणार नाही. बंदुकीचा धाक दाखवून चर्चा होऊ शकत नाही. कोणत्याही अटीशर्तीविना सरकारने चर्चेची तयारी ठेवावी", असं राकेश टिकैत म्हणाले.