नवी दिल्ली - देशात सध्या लव जिहाद विरोधात कायदा करण्याच्या मागणीवर जोर दिला जात आहे. मध्य प्रदेशात शिवराज सरकार लव जिहादवर कायदा बनवण्यासाठी विधेयक आणणार आहे. त्यानंतर आता उत्तर प्रदेश सरकारने देखील लव जिहादच्या घटना रोखण्यासाठी कायदा करण्याची तयारी सुरू केली आहे. यात दरम्यान लव जिहाद प्रकरणावरून एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे.
असदुद्दीन ओवैसी यांनी लव जिहादवरून भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. "विशेष विवाह कायदा रद्द केल्यास घटनेतील कलम 14 आणि 21 चं उल्लंघन होणार आहे. त्यांनी संविधानाचा अभ्यास करायला हवा. द्वेषाचा प्रसार करणं आता काम करणार नाही. बेरोजगारीचे बळी ठरलेल्या तरुणांचं लक्ष विचलित करण्यासाठी भाजपा नाटक करत आहे" असं ओवैसी यांनी म्हटलं आहे.
शिवराज सरकारचा मोठा निर्णय; ‘लव जिहाद’वर कायदा आणणार, ‘इतकी’ वर्ष जेलमध्ये जावं लागणार
मध्य प्रदेशात शिवराज सरकार लव जिहादवर कायदा बनवण्यासाठी विधेयक आणणार आहे. या विधेयकानुसार फसवणूक करून लग्न केल्यास पाच वर्षांची जेलची हवा खावी लागणार आहे. लव जिहाद प्रकरणी अजामीनपात्र गुन्हा नोंदवण्यात येईल आणि लव जिहाद सिद्ध झाल्यास लग्न रद्दही होणार आहे. याबाबत मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी माध्यमांना माहिती दिली.
गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले की, मध्य प्रदेशात धर्म स्वातंत्र्य विधेयक 2020 आणण्याची तयारी सुरु आहे. लवकरच हे विधेयक विधानसभेत आणलं जाईल. यात प्रलोभन, फसवणूक आणि बळजबरीने लग्न केल्यास दोषींवर 5 वर्षांची कठोर कारवाई होणार आहे. तसेच हा गुन्हा अजामीनपात्र असल्याने त्यातील दोषींना जामीन मिळणार नाही.
तसेच हा गुन्हा करणाऱ्या माणसाला मदत करणाऱ्या व्यक्तीलाही अशाच प्रकारे शिक्षा होणार आहे. या प्रकरणात तक्रार करणे गरजेचे आहे. लग्नासाठी धर्मांतर केलेल्या जोडप्यांनी एक महिन्याच्या आत स्थानिक जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे माहिती देणं आवश्यक आहे. हे विधेयक पुढच्या अधिवेशनात मांडले जाईल असं गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले.
नितीश कुमार मुख्यमंत्री झाल्यावर प्रशांत किशोर यांनी साधला निशाणा, म्हणाले...https://t.co/DDmFl8uvO7#BiharElectionResults2020#BiharResults#NitishKumar#PrashantKishorpic.twitter.com/4heeKOo6tx
— Lokmat (@MiLOKMAT)