गुवाहाटी : आसाममधील लोकसभेच्या १४ मतदारसंघांमधील मतदान आज संपत आहे. या सीमावर्ती राज्यामध्ये तीन टप्प्यांमध्ये मतदान झाले असून त्याची आज सांगता होत आहे. भाजप, आसाम गण परिषद आणि बोडोलॅण्ड पीपल्स फ्रंट यांनी युती करून ही निवडणूक लढविली आहे. त्यांच्या विरोधात कॉँग्रेस स्वबळावर रिंगणात आहे. आॅल इंडिया युनायटेड डेमॉक्रॅटिक फ्रंटने तीन जागांवर उमेदवार दिले आहेत.नॅशनल रजिस्टर आॅफ सिटीझन्स (एनआरसी)मधील नोंदणीवरून येथील नागरिकांमध्ये असलेला असंतोष हा या निवडणुकीमधील मुद्दा ठरला आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या मतांमध्ये सुमारे २० टक्के वाढ होऊन ती ३६.५ टक्के झाली. या पक्षाने ७ जागा पटकावल्या. कॉँग्रेसची मते सुमारे ४.५ टक्क्यांनी कमी होऊन त्यांना तीन जागा मिळाल्या होत्या.
आसाम: भाजप व काँग्रेस उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 3:43 AM