नवी दिल्ली - नुकत्याच आटोपलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये आसाममधील सत्ता कायम राखण्यात भाजपाला यश आले होते. (Assam Assembly Election 2021) मात्र निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर आता आसाममध्ये नेतृत्वबदल करण्याची तयारी भाजपाकडून सुरू झाली आहे. येथे विद्यमान मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल ( Sarbananda Sonowal ) यांच्याऐवजी पूर्वोत्तर भारतात भाजपाचा विस्तार करणाऱ्या बड्या नेत्याकडे (Himanta Biswa Sarma ) राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवण्याची तयारी पक्षनेतृत्वाकडून करण्यात येत आहे. (BJP ready to change CM in Assam even after victory; The name of Himanta Biswa Sarma is at the forefront for CM Post)
आसाममध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने सर्वानंद सोनोवाल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या महाजोत आघाडीचे आव्हान परतवून लावले होते. भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला या निवडणुकीत ७५ जागांवर विजय मिळाला आहे. दरम्यान, आसाममधील विजयानंतर भाजपाकडून राज्यात नेतृत्वबदल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विद्यमान मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याऐवजी दिग्गज नेते हेमंत बिस्वा शर्मा यांच्याकडे राज्याचे नेतृत्व सोपवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. तसेच सध्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत हेमंत बिस्वा शर्मा यांचे नाव आघाडीवर आहे.
राज्यात सुरू असलेल्या नेतृत्वबदलाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आणि आरोग्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा आज दिल्लीमध्ये आले होते. येथे त्यांनी राज्यातील घडामोडींबाबत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या आसाम विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ७५ जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेच्या नेतृत्वाखालील आघाडीला ५० जागांवर समाधान मानावे लागले होते. तर इतरांच्या खात्यात एक जागा गेली होती.