Assembly Election Result 2021: पक्षांनी जल्लोषाचा आदेश धुडकावला; निवडणूक आयोगाकडून कारवाईचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 01:39 PM2021-05-02T13:39:05+5:302021-05-02T13:43:40+5:30
West Bengal, Tamil Nadu, Assam, Kerala, Puducherry Assembly Election: कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे निवडणूक आयोगाने पाच राज्ये आणि लोकसभा विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये निकालानंतर कोणताही जल्लोष न करण्याचे आदेश दिले होते.
कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे निवडणूक आयोगाने पाच राज्ये आणि लोकसभा विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये निकालानंतर कोणताही जल्लोष न करण्याचे आदेश दिले होते. मात्र, तरीदेखील तामिळनाडू, पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर जल्लोष सुरु झाला आहे. यामुळे निवडणूक आयोगाने राज्यांच्या सचिवांनाच आदेश जारी केले आहेत. (ECI takes serious note of reports coming in of congregation of people to celebrate anticipated victory)
जे कोणी निर्बंधांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर एफआयआर दाखल करावा, तसेच ज्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत जल्लोष केला जात असेल त्या पोलीस ठाण्याच्या मुख्य अधिकाऱ्याचे निलंबन करावे असे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. तसेच अशा प्रकारच्या प्रत्येक घटनेचा अहवाल आयोगाकडे तातडीने सोपवावा असेही म्हटले आहे.
Election Commission of India writes to Chief Secretaries of all States/UTs to "prohibit victory celebrations urgently". ECI also directs that responsible SHOs and other officers must be suspended immediately and criminal and disciplinary actions must be initiated against them pic.twitter.com/4aEydSH42P
— ANI (@ANI) May 2, 2021
तामिळनाडूमध्ये डीएमकेला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे पाहून कार्यकर्ते अन्ना अरिवल्यमबाहेर जल्लोष करत आहेत. फटाके फोडत नाचत आहेत. तसेच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानाबाहेर तृणमूलचे कार्यकर्ते विजय साजरा करत आहेत. यामुळे कोरोना संक्रमण न होण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशांचा भंग होत आहे. यामुळे निवडणूक आयोगाने तातडीने या पाच राज्यांच्या मुख्य सचिवांना आदेश दिले आहेत.