West Bengal Assembly Election Result 2021 Highlights: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ((Mamata banrejee)) यांचा पक्ष तृणमूल काँग्रेसने (TMC) विधानसभा निवडणुकीत (West Bengal Election Result) सत्ता स्थापनेकडे कूच सुरु केली आहे. अद्याप कोणत्याही जागेचा निकाल हाती आलेला नसून तृणमूलला जवळपास 205 जागांवर बहुमत मिळण्याची शक्यता आहे. एकीकडे पक्ष जिंकत असताना ममता बॅनर्जी यांची जागा धोक्यात आली होती. भाजपाचे सुवेंदू अधिकारी यांनी त्यांना मतमोजणीच्या सातव्य़ा फेऱ्यांपर्यंत झुंझवत ठेवले होते. मात्र, अखेर ममता यांना आघाडी मिळाली आहे. (Mamata banerjee leading after long time; Bjp's Suvendu adhikari trailing in Nandigram Election)
पोस्टल मतदान मोजणीवेळी ममता यांना त्यांचे जुने सहकारी सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांनी ममता यांना मागे टाकण्यास सुरुवात केली होती. पहिल्या फेरीत ममता या १५०० मतांनी पिछाडीवर होत्या. हळूहळू ही पिछाडी वाढत 8000 वर गेली होती. यामुळे तृणमूलच्या गोटात कमालीची शांतता पसरली होती. भाजपाला सुरुवातीला समसमान आघाडी मिळत असल्याने भाजपाच्या गोटात आनंदाचे वातावरण होते. मात्र, हळूहळू टीएमसीने मोठ्या अंतराने भाजपाला मागे टाकले आणि भाजपाचा हा उत्साह मावळला. टीएमसी जिंकत असल्याचे दिसत असताना दुसरीकडे ममतांच्या नंदीग्रामवर साऱ्यांचे लक्ष केंद्रीत झाले होते.
ममता बॅनर्जी यांनी आठव्या फेरीत सुवेंदू अधिकारी यांचे लीड जवळपास निम्म्याने कमी केले. नंतर अल्पशा मतांनी सुवेंदू अधिकारी यांच्यावर आघाडी घेतली होती, नंतर थोड्या वेळाने त्यांनी जवळपास 2700 मतांनी आघाडी मिळविली आहे. आता ममता ही आघाडी टिकवतात की सुवेंदू पुन्हा बाजी मारतात हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.