मुंबई: देशातील पाच राज्यांमधील निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट झाला आहे. मतमोजणीला सुरुवात होऊन सहा तास उलटले आहेत. पाच राज्यांपैकी केवळ एका राज्यात भारतीय जनता पक्षाला सत्ता मिळताना दिसत आहे. आसाममध्ये भाजप सत्तेत कायम राहील हे जवळपास स्पष्ट झालं आहे. तर इतर राज्यांमध्ये भाजपला फारसं यश मिळताना दिसत नाही. पश्चिम बंगालमध्ये भाजपनं संपूर्ण ताकद पणाला लावली होती. मात्र तिथेही भाजपची गाडी ८५ च्या आसपास अडकली आहे. तर ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस पक्ष २०० हून अधिक जागा जिंकताना दिसत आहे. (Assembly Election Result 2021 ncp chief sharad pawar prediction goes right bjp keeps assam)बंगालमध्ये दिदींचाच खेला! सर्व एक्झिट पोलचा अंदाज चुकला; भाजपला दे धक्कापाच राज्यांमध्ये निवडणूक प्रचाराचा धुरळा उडाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक भाकित वर्तवलं होतं. इतर चार राज्यांच्या तुलनेत आसाममध्ये भाजपची स्थिती चांगली आहे. त्यामुळे तिथे भाजप सत्ता राखेल. तर इतर राज्यांमध्ये दुसरे पक्ष विजयी होतील, असं शरद पवारांनी म्हटलं होतं. पवारांनी वर्तवलेला अंदाज खरा ठरताना दिसत आहे. केंद्रातील सत्तेचा पूर्ण गैरवापर करूनही भाजपला बंगालची सत्ता मिळणार नाही. ममता बॅनर्जी सत्ता कायम राखतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.भाजप-तृणमूलमध्ये टशन, पण एका माणसाला वेगळंच टेन्शन; 'नोकरी' जाणार की राहणार?आसाममधील १२५ पैकी ७७ जागांवर भाजपचे उमेदवार पुढे आहेत. त्यामुळे आसाममध्ये भाजपची सत्ता कायम राहील हे स्पष्ट झालं आहे. पुद्दुचेरीत विधानसभेच्या एकूण ३० जागा आहेत. यापैकी भाजप आणि मित्रपक्ष ८ जागांवर आघाडीवर आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजप सध्या ८६ जागांवर पुढे आहे. तर तमिळनाडूत भाजप आणि त्यांचा मित्रपक्ष एआयडीएमकेचा धुव्वा उडाला आहे. केरळमध्येही भाजपला अगदी नाममात्र यश मिळताना दिसत आहे.
Assembly Election Result 2021: शरद पवारांचा 'तो' अंदाज शतप्रतिशत खरा ठरला; दीड महिन्यापूर्वीच वर्तवलं होतं निकालाचं भाकित
By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2021 2:39 PM