Mamata Banerjee: ममता बॅनर्जी हरल्या तर काय होईल?; पहा काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार प्रभू चावला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 02:59 PM2021-05-02T14:59:17+5:302021-05-02T15:00:57+5:30

Mamata Banerjee trailing from Nandigram election: ममता बॅनर्जी  यांनी आपला नेहमीचा मतदारसंघ सोडून सुवेंदू अधिकारी यांना हरविण्यासाठी त्यांच्याच गडामध्ये आव्हान दिले आहे. एकप्रकारे त्यांनी सुवेंदू यांच्या विरोधात उभे राहून उर्वरित पश्चिम बंगालला धाडसी असल्याचे दाखविलेले असताना त्यांची जागा धोक्यात आली आहे.

Assembly Election Result 2021: What if Mamata Banerjee lost seat from Nandi gram? see senior journalist Prabhu chawla answer | Mamata Banerjee: ममता बॅनर्जी हरल्या तर काय होईल?; पहा काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार प्रभू चावला

Mamata Banerjee: ममता बॅनर्जी हरल्या तर काय होईल?; पहा काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार प्रभू चावला

googlenewsNext

West Bengal Assembly Election Result 2021 Highlights:  ममता बॅनर्जी  (Mamata banrejee) यांनी आपला नेहमीचा मतदारसंघ सोडून सुवेंदू अधिकारी यांना हरविण्यासाठी त्यांच्याच गडामध्ये आव्हान दिले आहे. एकप्रकारे त्यांनी सुवेंदू यांच्या विरोधात उभे राहून उर्वरित पश्चिम बंगालला धाडसी असल्याचे दाखविलेले असताना त्यांची जागा धोक्यात आली आहे. सुवेंदू अधिकारी यांनी सुरुवातीपासूनच लीड घेतलेले असून फक्त दोन फेऱ्यांमध्येच ममता या आघाडीवर होत्या. यामुळे ममता यांना पराभवाचा धक्का बसला तर काय होईल, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. (Mamata Banerjee trailing in West bengal assembly election from Nandigram Constituency.)

West Bengal Election Result 2021 Highlights: खेला होबे की खेळ संपणार? देशभरातील ५ राज्यांच्या ८२२ जागांना फक्त नंदीग्रामची एक सीट भारी

West Bengal Results 2021:पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचा नाही, डाव्यांचा खेळ खल्लास; भाजपाला मतदारांनी दिला 'चकवा'

या प्रश्नावर आजतकवरील डिबेटमध्ये ज्येष्ठ पत्रकार प्रभू चावला यांनी उत्तर दिले आहे. ममता या जर हरण्याच्या स्थितीत असतील तर त्यांचा पक्ष कधीही बहुमतात येणार नाही. जेव्हा ममता जिंकणार असतील तेव्हाच तृणमूल काँग्रेसला बहुमत मिळेल. यामुळे ममता सध्याचे कल पाहता तृणमूल काँग्रेस बहुमताकडे जात आहे. यामुळे थोडा वेळ वाट पहावी लागेल, असे ते म्हणाले.


तसेच ममता बॅनर्जी या नंदीग्राममधून हरतीलही, नाकारता येत नाही. जरी त्या हरल्या तरीदेखील त्यांचा पक्ष असल्याने मुख्यमंत्री म्हणून त्यांनाच निवडले जाईल. त्यांच्या भाच्याला तसेही तृणमूलचे नेते पक्षाचा अध्यक्षदेखील बनवू इच्छित नाहीएत, असे चावला यांना सांगितले. 

Assembly Election Result 2021: 'पराभवाच्या फेऱ्यां'त अडकलेल्या ममता बॅनर्जींची 'दीदीगिरी', आठव्या फेरीत मागे पडले अधिकारी

 पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ((Mamata banrejee)) यांचा पक्ष तृणमूल काँग्रेसने (TMC) विधानसभा निवडणुकीत (West Bengal Election Result) सत्ता स्थापनेकडे कूच सुरु केली आहे. अद्याप कोणत्याही जागेचा निकाल हाती आलेला नसून तृणमूलला जवळपास 205 जागांवर बहुमत मिळण्याची शक्यता आहे. एकीकडे पक्ष जिंकत असताना ममता बॅनर्जी यांची जागा धोक्यात आली होती. भाजपाचे सुवेंदू अधिकारी यांनी त्यांना मतमोजणीच्या सातव्य़ा फेऱ्यांपर्यंत झुंझवत ठेवले होते. मात्र, अखेर ममता यांना आघाडी मिळाली आहे.  पोस्टल मतदान मोजणीवेळी ममता यांना त्यांचे जुने सहकारी सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांनी  ममता यांना मागे टाकण्यास सुरुवात केली होती. पहिल्या फेरीत ममता या १५०० मतांनी पिछाडीवर होत्या. हळूहळू ही पिछाडी वाढत 8000 वर गेली होती. यामुळे तृणमूलच्या गोटात कमालीची शांतता पसरली होती. भाजपाला सुरुवातीला समसमान आघाडी मिळत असल्याने भाजपाच्या गोटात आनंदाचे वातावरण होते. मात्र, हळूहळू टीएमसीने मोठ्या अंतराने भाजपाला मागे टाकले आणि भाजपाचा हा उत्साह मावळला.

Assembly Election Result 2021: पक्षांनी जल्लोषाचा आदेश धुडकावला; निवडणूक आयोगाकडून कारवाईचे आदेश

टीएमसी जिंकत असल्याचे दिसत असताना दुसरीकडे ममतांच्या नंदीग्रामवर साऱ्यांचे लक्ष केंद्रीत झाले होते.  ममता बॅनर्जी यांनी आठव्या फेरीत सुवेंदू अधिकारी यांचे लीड जवळपास निम्म्याने कमी केले. नंतर अल्पशा मतांनी सुवेंदू अधिकारी यांच्यावर आघाडी घेतली होती, नंतर थोड्या वेळाने त्यांनी जवळपास 2700 मतांनी आघाडी मिळविली होती. परंतू ममता यांना पुन्हा १३ व्या फेरीत सुवेंदू अधिकारी यांनी 4000 मतांनी मागे टाकले आहे. 

Web Title: Assembly Election Result 2021: What if Mamata Banerjee lost seat from Nandi gram? see senior journalist Prabhu chawla answer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.