Assam Assembly Election Results: भाजपानं आसाममध्ये जे केलं त्याने इतिहास घडला; अमित शहांच्या रणनीतीचा विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 06:29 PM2021-05-02T18:29:46+5:302021-05-02T18:32:16+5:30

Assembly Election Results Live: आसाममध्ये पहिल्यांदा बिगर काँग्रेसचं सरकार सलग दुसऱ्यांदा सत्तेत आलं आहे असा पराक्रम भाजपाने आसाममध्ये केला आहे

Assembly Election Results: What BJP did in Assam made history; The victory of Amit Shah strategy | Assam Assembly Election Results: भाजपानं आसाममध्ये जे केलं त्याने इतिहास घडला; अमित शहांच्या रणनीतीचा विजय

Assam Assembly Election Results: भाजपानं आसाममध्ये जे केलं त्याने इतिहास घडला; अमित शहांच्या रणनीतीचा विजय

Next
ठळक मुद्देआसाममध्ये विरोधी पक्षांशी मुकाबला करत भाजपाच्या नेतृत्त्वातील आघाडीने सत्ता कायम राखण्यात यश मिळवलं आहेआसामी लोकांच्या आंदोलनातून राज्यात १९८५ आणि १९९६ मध्ये आसाम गण परिषद सत्तेत आली.नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून निवडणुकीत सुरुवातीला बचावात्मक पवित्रा घेणाऱ्या भाजपानं नंतर आक्रमक भूमिका घेतली

नवी दिल्ली – देशातील ५ राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आज घोषित झाले आहेत. या निवडणुकीत भाजपाची कही खुशी कही गम अशी अवस्था झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपाला ममता बॅनर्जी यांच्या सत्तेला सुरुंग लावण्यात अपयश आलं आहे. याठिकाणी ममता बॅनर्जी सरकार बनवण्याची हॅट्रीक करणार आहे. तर दुसरीकडे भाजपाने आसाम विधानसभा निवडणुकीत १० पक्षांच्या महाआघाडीला उद्ध्वस्त केले आहे.

आसाममध्ये पहिल्यांदा बिगर काँग्रेसचं सरकार सलग दुसऱ्यांदा सत्तेत आलं आहे असा पराक्रम भाजपाने आसाममध्ये केला आहे. आसाममध्ये विरोधी पक्षांशी मुकाबला करत भाजपाच्या नेतृत्त्वातील आघाडीने सत्ता कायम राखण्यात यश मिळवलं आहे. या आघाडीत आसाम गण परिषद आणि यूनाइटेड पीपुल्स पार्टी लिबरल यांचाही समावेश आहे.आसाममध्ये पहिल्यांदा १९७८ मध्ये बिगर काँग्रेसचं सरकार बनलं होतं. त्यानंतर जनता पार्टी सत्तेत आली. मात्र १८ महिन्यानंतर अंतर्गत वादातून गोलप बोरबोरा सरकार कोसळलं. आसामी लोकांच्या आंदोलनातून राज्यात १९८५ आणि १९९६ मध्ये आसाम गण परिषद सत्तेत आली. परंतु तेदेखील सलग दोनदा सत्तेत राहिले नाहीत. २००१ पासून २००६ पर्यंत आसाममध्ये तरूण गोगाई यांच्या नेतृत्वात काँग्रेसचं सरकार होतं.

हिंदू मतांची एकजूट

या निकालातून दिसत आहे की, भाजपाने आसाममध्ये काँग्रेस आघाडीत सहभागी असणाऱ्या बदरुद्दीन अजमल यांच्यावर निशाणा साधत हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्यात यश मिळवलं. २०१४, २०१६ आणि २०१९ च्या निवडणुकीत भाजपाचं दमदार यश या निवडणुकीतही कायम राहिले.

CAA मुद्द्यावर आक्रमक

नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून निवडणुकीत सुरुवातीला बचावात्मक पवित्रा घेणाऱ्या भाजपानं नंतर आक्रमक भूमिका घेत सडेतोड मतं मांडली. घुसखोरांचा मुद्दा उचलत सत्ताधारी पक्षाने दावा केला की, महाआघाडी सत्तेत आला तर स्थानिक लोकांचे जीवन धोक्यात आहे. भाजपाची ही रणनीती निवडणुकीत कामाला आली.

सोशल इंजिनिअरिंगचं राजकारण

तज्ज्ञांच्या मते, आसामी मतदारांसोबतच भाजपाने सोशल इंजिनिअरिंगचं राजकारणही केले. कार्बी, दिमासा, मीशिग,राभा आणि तिवा समुदायाच्या मतदारांना पक्षाकडे वळवण्यात भाजपाला यश आलं. त्याचा परिणाम असा झाला की महाआघाडीचे उमेदवार अनेक ठिकाणी पडले.

Web Title: Assembly Election Results: What BJP did in Assam made history; The victory of Amit Shah strategy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.