‘दीदी बोले- खेला होबे, BJP बोले- विकास होबे’; पंतप्रधानांचा ममता बॅनर्जींवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 01:10 PM2021-03-18T13:10:26+5:302021-03-18T13:13:40+5:30
पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकांना उरले अवघे काही दिवस, तृणमूल आणि भाजपमध्ये आरोपप्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या आहेत.
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्या आहे. सध्या पश्चिम बंगालमध्ये अनेक दिग्गज नेते रॅलीमध्ये सहभागी होताना दिसत आहे. तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही सुरु आहेत. गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरूलिया येथे रॅलीला संबोधित केलं. यावेळी त्यांनी ममता बॅनर्जी आणि पश्चिम बंगाल सरकारवर जोरदार निशाणा साधला. दीदी बोले- खेला होबे, BJP बोले- विकास होबे’, असं म्हणत पंतप्रधानांनी ममता बॅनर्जींना टोला लगावला. यावेळी त्यांनी तृणमूल काँग्रेस (TMC) म्हणजे ट्रान्सफर माय कमिशन असल्याचं म्हणत निशाणा साधला.
"पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस सरकारचे अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. ममता बॅनर्जी यांना हे माहित आहे म्हणून त्या 'खेला होबे' असं म्हणत आहेत. जर तुम्हाचं ध्येय सेवा करणं असेल तर खेळलं जात नाही. आता खेळ संपणार आणि विकास सुरू होणार," असं मोदी यावेळी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पुरुलिया येथील भाषणाची सुरूवाती बंगाली भाषेतूनच केली. "पुरुलियाचं प्रभू श्रीराम आणि माता सीता यांच्याशी जुनं नातं आहे. आज पुरुलियामध्ये पाण्याचा संघर्ष ही मोठी समस्या आहे. या ठिकाणी पाणी नसल्यानं शेती, पशूपालन करण्यास ससम्या निर्माण होत आहेत. तर पिण्याच्या पाण्याच्या समस्याही वाढत आहेत. या ठिकाणच्या लोकांना स्वत:च्या भरवशावर सोडून तृणमूल काँग्रेस आपला खेळ खेळण्यात व्यस्त आहे. त्यांनी पुरुलियाच्या लोकांना भेदभाव करणारं प्रशासन दिलं आणि सर्वात मागासलेलं क्षेत्रही बनवलं," असंही ते म्हणाले.
पुरुलिया क्षेत्राची कनेक्टिव्हीटी सुधारण्याची आवश्यकता आहे. बंगालच्या प्रत्येक क्षेत्राला रेल्वे मार्गानं जोडण्याला आमचं प्राधान्य आहे. २ मे नंतर जेव्हा भाजपचं सरकार सत्तेत येईल त्यानंतर रेल्वेच्या प्रकल्पांना गती येईल. पुरुलिया आणि आसपासच्या ठिकाणी अशी व्यवस्था केली जाईल की या ठिकाणाहून लोकांना दुसरीकडे जावं लागणार नाही. बंगालसाठी केंद्र सरकारनं ५० हजार कोटी रूपयांच्या प्रकल्पांना मंजुरी दिली असल्याचंही त्यांनी सांगितलं.
প্রধানমন্ত্রী শ্রী @narendramodi জী পুরুলিয়াবাসীর মাঝে এসে উপস্থিত হলেন। #BJPErOngikarSonarBanglapic.twitter.com/5EdtQHmi3t
— BJP Bengal (@BJP4Bengal) March 18, 2021
दीदी भारताच्या कन्या
"आमच्यासाठी दीदी या भारताच्या कन्या आहेत. जेव्हा त्यांना दुखापत झाली तेव्हा आम्हालाही चिंता झाली. त्यांच्या पायाची दुखापत लवकरच बरी होवो," असंही मोदी यावेळी म्हणाले. केंद्र सरकरानं जेव्हा या ठिकाणी स्वस्त दरातील तांदूळ पाठवले तेव्हा टीएमसीच्या काही लोकांनी त्यातही घोटाळा केला. भरती परीक्षांमध्येही टीएमसीनं जे काही केलंय तेदेखील नीट केलं जाणार असल्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.