शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

तुमची व्होट बँक भारतात आहे की पाकिस्तानात? मोदींचा कुमारस्वामींना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2019 7:49 PM

एअर स्ट्राइकवरुन पंतप्रधान मोदींची टीका

चित्रदुर्ग: बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलानं केलेल्या एअर स्ट्राइकवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्यावर शरसंधान साधलं आहे. तुमची व्होट बँक भारतात आहे की पाकिस्तानात?, असा सवाल मोदींनी उपस्थित केला. कर्नाटकातल्या चित्रदुर्गमधील सभेत मोदी बोलत होते. 'पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना मारल्यानं भारतातल्या काहींना दु:ख होत आहे. इथले मुख्यमंत्री तर आणखी एक पाऊल पुढे गेले. आपल्या सैन्याच्या शौर्याबद्दल बोलायचं नाही, असं त्यांना वाटत नाही. त्यामुळे त्यांच्या व्होट बँकेला धक्का लागतो. मला त्यांना विचारावंसं वाटतं, तुमची व्होट बँक भारतात आहे की पाकिस्तानात?,' अशा शब्दांमध्ये मोदींनी कुमारस्वामींचा समाचार घेतला. पंतप्रधान मोदींनी म्हैसूरमधील जनसभेत हिंदू दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसवर तोफ डागली. 'काँग्रेसच्या काळात जितक्या दहशतवादी घटना घडल्या, त्यांचे धागेदोरे पाकिस्तानशी संबंधित होते. मात्र काँग्रेसच्या नेत्यांनी हिंदू दहशतवादाच्या नावाखाली खोट्या गोष्टी पसरवल्या. जेव्हा आमच्या सुपुत्रांनी पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांवर हल्ला चढवला, तेव्हा यांनी पुरावे मागितले. जम्मू-काश्मीरबद्दलचे यांचे आणि पाकिस्तानचे विचार सारखेच आहेत,' अशी टीका मोदींनी केली. म्हैसूरमधील सभेत मोदींनी सबरीमालाचा मुद्दा उपस्थित केला. 'सबरीमालाबद्दल तुमच्या ज्या भावना आहेत, त्याच भाजपाच्या भावना आहेत. सबरीमाला मंदिराशी संबंधित आस्थेचा, परंपरेचा आणि पुजेच्या पद्धतीचा विषय सर्वोच्च न्यायालयासमोर मांडण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल. आस्थेशी संबंधित विषयांना घटनात्मक संरक्षण मिळून देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू,' असं आश्वासन मतदारांनी मोदींनी दिलं.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकkumarswamyकुमारस्वामीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक