मोदी सरकारमध्ये बांगलादेशी व्यक्तीला मंत्रिपद? नुकतीच शपथ घेतलेल्या मंत्र्यावर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 08:51 AM2021-07-18T08:51:11+5:302021-07-18T08:55:03+5:30

Nisith Pramanik News: राज्यसभा खासदार आणि आसाम प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रिपून बोरा यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Bangladeshi man gets ministerial post in Modi government? Serious allegations against the recently sworn in minister Nisith Pramanik |   मोदी सरकारमध्ये बांगलादेशी व्यक्तीला मंत्रिपद? नुकतीच शपथ घेतलेल्या मंत्र्यावर गंभीर आरोप

  मोदी सरकारमध्ये बांगलादेशी व्यक्तीला मंत्रिपद? नुकतीच शपथ घेतलेल्या मंत्र्यावर गंभीर आरोप

googlenewsNext
ठळक मुद्देरिपून बोरा यांनी केंद्रीय राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक यांच्यावर ते बांगलादेशी नागरिक असल्याचा केला आरोपरिपून बोरा यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करण्याची केली मागणी प्रामाणिक यांच्या निकटवर्तीयांनी हे आरोप फेटाळले

नवी दिल्ली - मोदी सरकारमध्ये एका बांगलादेशी व्यक्तीला मंत्रिपद देण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. राज्यसभा खासदार आणि आसाम प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रिपून बोरा यांनी केंद्रीय राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक यांच्यावर ते बांगलादेशी नागरिक असल्याचा आरोप केला आहे. रिपून बोरा यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. मात्र प्रामाणिक यांच्या निकटवर्तीयांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. प्रामाणिक यांचा जन्म भारतातच झाला असून, इथेच ते लहानाचे मोठे झाले. तसेच त्यांचे इथेच शिक्षण झाले असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. (Bangladeshi man gets ministerial post in Modi government? Serious allegations against the recently sworn in minister Nisith Pramanik)

रिपून बोरा यांनी पंतप्रधान मोदींना पाठवलेले पत्र ट्विटरवर पोस्ट केले आहे. त्यांनी काही वृत्तवाहिन्या आणि संकेतस्थळांवरील वृत्ताचा दाखला देत निसिथ प्रामाणिक यांच्यावर ते बांगलादेशी नागरिक असल्याचा आरोप केला आहे. ते लिहितात की, निसिथ प्रामाणिक यांचे जन्मस्थान हरिनाथपूर आहे. ते बांगलादेशमधील गैयबंधा जिल्ह्यात आहे. ते संगणकाचे शिक्षण घेण्यासाठी भारतात आले होते. संगणक विषयात पदवी घेतल्यानंतर ते तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश करून खासदारकी मिळवली. 

वृत्तवाहिन्यांवरील वृत्तानुसार प्रामाणिक यांनी माहितीमध्ये फेरफार करून निवडणूक अर्जात आपला पत्ता कुचबिहार असल्याची नोंद केली. वृत्तवाहिन्यांनी बांगलादेशमधील त्यांच्या मूळ गावात आनंदाचे वातावरण असल्याचे दाखवले आहे. ज्यात त्यांचे मोठे भाऊ आणि काही ग्रामस्थ प्रामाणिक हे केंद्रीय मंत्री बनल्याने आनंद व्यक्त करताना दिसत आहेत, असा दावा बोरा यांना केला आहे. तसेच मोदींना लिहिलेल्या पत्रात बोरा म्हणतात की, जर असं असेल तर देशासाठी ही फार गंभीर बाब आहे. एका परदेशी नागरिकाला मंत्रिपदी नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे मी तुमच्याकडे मागणी करतो की, निसिथ प्रामाणिक यांचे जन्मस्थान आणि राष्ट्रीयत्वाची पारदर्शकपणे तपासणी व्हावी, जेणेकरून संपूर्ण देशात निर्माण झालेली संशयाची स्थिती दूर होईल.

दरम्यान, पश्चिम बंगाल भाजपाचे महासचिव सयंतन बसू यांनी सांगितले की, हा आरोप बिनबुडाचा आहे. जर त्यांना हे प्रकरण वाढवायचे असेल, तर तृणमूल काँग्रेसच न्यायालयात जाण्यासाठी मोकळे आहे. याबाबत प्रामाणिक यांच्या निकटवर्तीयांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, प्रामाणिक हे देशभक्त भारतीय आहेत. त्यांचा जन्म, पालन-पोषण आणि शिक्षण भारतातच झाले आहे. त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे आहेत. जर मंत्र्यांचे नातेवाईक अन्य देशात आनंद व्यक्त करत असतील तर के काय करू शकतात. जर कॅनडाच्या खासदाराचे भारतीय नातेवाईक अभिमान व्यक्त करत असतील, तर त्याचा त्या कॅनडामधील खासदाराशी काय संबध, असा सवाहली त्यांनी उपस्थित केला.  

Web Title: Bangladeshi man gets ministerial post in Modi government? Serious allegations against the recently sworn in minister Nisith Pramanik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.