ओबामा प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून ओबामांच्या दौ-यानिमित्त दिल्लीत सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
स्वागतानंतर ओबामा मिशेल ओबामा आणि मोदी अभिवादन करताना.
नवे पर्व.... ओबामा आणि मोदी यांच्या गळाभेटीचा क्षण.
बराक ओबामा यांच्या स्वागतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिष्टाचार बाजूला ठेवून दिल्ली विमानतळावर उपस्थित होते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा तीन दिवसांच्या भारत दौ-यावर असून रविवारी सकाळी दिल्लीतील पालम विमानतळावर त्यांचे आगमन झाले. ओबामा यांच्यासोबत त्यांची पत्नी मिशेल यादेखील भारतात आल्या आहेत.
राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात तिन्ही सैन्य दलांकडून बराक ओबामा यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आले. गार्ड ऑफ ऑनर देणा-या पथकाचे नेतृत्व विंग कमांडर पूजा ठाकूर यांनी केले. एखाद्या देशाच्या अध्यक्षांना एका महिला कमांडरच्या नेतृत्वाखाली गार्ड ऑफ ऑनर देण्याची ही पहिलीच वेळ होती.
गार्ड ऑफ ऑनर स्वीकारल्यानंतर ओबामा यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मारकावर पुष्पांजली वाहिली. तसेच राजघाटावर पिंपळाचे रोपटे लावून ओबामा यांनी अनेखी स्मृती जतन केली.
हैद्राबाद हाउस गार्डनमध्ये नरेंद्र मोदी आणि बराक ओबामा यांनी "चाय पे चर्चा" केली.
हैद्राबाद हाऊसमधील प्रदीर्घ चर्चेनंतर भारत - अमेरिका अणुकरारातील विघ्ने दूर झाल्याची महत्त्वपूर्ण घोषणा नरेंद्र मोदी आणि बराक ओबामा यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली.
बराक ओबामा यांनी राष्ट्रपती भवनातील स्वागत समारंभात आणि मोदींसोबतच्या संयुक्त परिषदेत नमस्ते असे सांगत उपस्थितांशी संवाद साधला.
रविवारी रात्री राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ओबामा यांच्यासाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. या स्नेहभोजनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह सर्व प्रमुख नेते आणि उद्योजक उपस्थित होते.