बेळगाव - दिवंगत खासदार सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी यांनी अटीतटीच्या लढतीत काँग्रेसच्या सतीश जारकीहोळी यांचा पराभव करत बेळगावच्या खासदार पदी विराजमान झाल्या आहेत. काँग्रेसचे सतीश जारकीहोळी यांचा त्यांनी ५ हजार २४० मतांच्या फरकानं पराभव केला. (BJP's Mangala Angadi beats Congress candidate Satish Jarkiholi in Belgaum ) शेवटच्या एका तासात क्रिकेट सामन्यातील सुपर ओव्हर प्रमाणे बढत आणि पिछाडी सुरू होती अखेर अंगडी यांनी शेवटच्या एका तासात निर्णायक आघाडी मिळवत विजय संपादन केला. भाजपच्या मंगला अंगडी यांना ४ लाख ४० हजार ३२७ मते मिळाली तर काँग्रेसचे सतीश जारकीहोळी यांनी त्यांना जोरदार टक्कर देत ४ लाख ३५ हजार ८७ मते मिळवली.अपेक्षेप्रमाणे तीन मतदारसंघात प्राबल्य असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शुभम शेळके यांना १ लाख १७ हजार १७४ मते मिळाली.
बेळगाव शहरातील टिळकवाडी येथील आर पी डी कॉलेज मध्ये रविवारी सकाळी 8 मतमोजणी सुरू झालो होती कोविड नियमावली यानुसार मतमोजणी सोशल डिस्टन्स वापर करण्यात आला होता.मतमोजणी केंद्रावर सकाळ पासूनच सतीश जारकीहोळी आणि मंगला अंगडी यापैकी कुणीही हजर नव्हते मात्र समितीच्या शुभम शेळके यांनी दोन तीन वेळा मतमोजणी फेरफटका मारला होता.