Belgaum Election Result: बेळगावमध्ये भाजपा-काँग्रेसमध्ये टफ फाईट; महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराला मिळतोय असा कौल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 11:25 IST2021-05-02T10:17:19+5:302021-05-02T11:25:03+5:30
belgaum election results 2021 : पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसोबतच बेळगाव लोकसभा निवडणुकीची मतमोजणीही सुरू आहे.

Belgaum Election Result: बेळगावमध्ये भाजपा-काँग्रेसमध्ये टफ फाईट; महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराला मिळतोय असा कौल
मुंबई - पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसोबतच बेळगाव लोकसभा निवडणुकीची मतमोजणीही सुरू आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये बेळगावमध्ये काँग्रेस आणि भाजपाच्या उमेदवारांमध्ये अटीतटीची लढाई दिसत आहे. तर महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांनाही मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. (Tough fight between BJP and Congress in Belgaum; The candidate of Maharashtra Ekikaran samati is getting the vote)
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार भाजपाच्या मंगल अंगडी आघाडीवर आहेत. सध्याच्या आकडेवारीनुसार त्यांना ७२ हजार ९६७ मते मिळाली आहे. तर काँग्रेसचे सतीश जरकीहोळी हे दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांना ६८ हजार ९२१ मते मिळाली आहेत. तर महाराष्ट्र एकीकरण समितीचे शुभम शेळके हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना १९ हजार ३०५ मते मिळाली आहेत.
भाजपाचे नेते आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचे निधन झाल्याने बेळगाव लोकसभा मतदारसंघातील जागा रिक्त झाली होती. त्यानंतर या मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली होती.