शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
5
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
6
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
7
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
8
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
9
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
10
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
11
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
12
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
13
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
14
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
15
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
16
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
17
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
18
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
19
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान

Sanjay Raut: बेळगाव प्रशासनाला संजय राऊतांच्या सभेचा धसका! स्टेजची केली मोडतोड; राऊतांनी दिला कडक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 6:05 PM

Sanjay Raut: शिवसेनेचे खासदार संजय राऊत बेळगावमध्ये दाखल झाले आहेत. पण बेळगाव प्रशासनानं संजय राऊत यांच्या सभेचा धसका घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊतबेळगावमध्ये दाखल झाले आहेत. पण बेळगाव प्रशासनानं संजय राऊत यांच्या सभेचा धसका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. बेळगाव प्रशासनाकडून संजय राऊत यांच्या सभेच्या व्यासपीठाची मोडतोड केल्याचा आरोप शिवसेनेच्यावतीनं करण्यात आला आहे. 

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी संजय राऊत बेळगावमध्ये दाखल झाले आहेत. बेळगावात राऊतांची प्रचारसभा होणार आहे. पण सभा होण्याआधीच बेळगाव प्रशासनानं सभेला विरोध करत व्यासपीठ आणि साऊंड सिस्टमची मोडतोड करण्यास सुरुवात केली आहे. खुद्द संजय राऊत यांनीही या घटनेसंदर्भात एक ट्विट केलं आहे आणि बेळगाव प्रशासनाला कडक शब्दात इशारा देखील दिला आहे. 

"बेळगावात उतरलोय. कर्नाटक सरकारकडून दडपशाहीला सुरुवात. संयुक्त महाराष्ट्र चौकातील सभेसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने बांधलेले व्यासपीठ तोडले..सभा होणारच! गोळ्या चालवल्या तरी हरकत नाही. ही अस्मितेची लढाई झालीय", असा रोखठोक इशारा संजय राऊत यांनी ट्विटमधून दिला आहे. 

बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. येत्या १७ एप्रिलला बेळगाव लोकसभा मतदारसंघासाठी निवडणुकीचं मतदान होणार आहे. तत्पूर्वी बेळगावात राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. शिवसेनेने या मतदारसंघातून माघार घेत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शुभम शेळकेला जाहीर पाठिंबा दिला आहे. बेळगाव मतदारसंघात काँग्रेस, भाजपा आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

कोण आहे शुभम शेळके?शुभम शेळके हे युवा पिढीचे प्रतिनिधी आहेत. युवकांना एकत्रित करून राष्ट्रीय पक्षात जाणारी तरुण पिढी त्यांनी समितीकडे आणि सीमाप्रश्नाकडे वळविली आहे. मराठी म्हणून जगताना स्वाभिमान बाळगा, कन्नडच्या विरोधात नाही; पण मराठी असल्याचा अभिमान ठेवा, हे विचार तरुणांमध्ये रुजविण्यात शुभम शेळके यशस्वी ठरले. त्यांचे नाव युवावर्गातून पुढे आले. आता त्यांच्या प्रचाराची धुरा युवकांनीच हाती घेतली आहे. यामुळे मराठी म्हणून जो कोणी या मतदारसंघात आहे, त्याचे मत शुभम यांना पडावे, हे एकमेव ध्येय आता युवकांनी बाळगले आहे. शुभम शेळके याच्या प्रचारासाठी लोक स्वत:हून वर्गणी गोळा करत आहे. जिथे शुभम प्रचाराला जाईल तिथे लोकं ५०० ते १००० रुपयांची मदत करत आहेत. त्यामुळे भाजपा, काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षांनाही शुभम शेळकेची दखल घेणं भाग पडत आहे. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतbelgaonबेळगावShiv Senaशिवसेना