शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

"ममतांचा पराभव केला नाही तर राजकारण सोडून देईन"

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 8:35 PM

bengal assembly elections : आगामी विधानसभा निवडणुकीत नंदीग्राम मतदारसंघातून  निवडणूक लढणार असल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी जाहीर केले आहे.

ठळक मुद्देसोमवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममध्ये निवडणूक रॅली घेतली.

कोलकाता : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. सध्या भाजपा आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममधून विधानसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. यावर, गेल्या काही दिवसांपूर्वी तृणमूल काँग्रेसला धक्का देत भाजपात प्रवेश केलेल्या शुभेंदु अधिकारी यांनी नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला नाही तर राजकारण सोडून देईन, असे म्हटले आहे.

सोमवारी सायंकाळी दक्षिण कोलकाता येथे झालेल्या जाहीर सभेत शुभेंदु अधिकारी बोलत होते. यावेळी टीएमसी ही पार्टी नसून खासगी लिमिटेड कंपनी आहे, असे शुभेंदु अधिकारी म्हणाले. याचबरोबर, ममता बॅनर्जींच्या राजकीय कौशल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत जर तृणमूल काँग्रेसला बिहारमधून निवडणूक रणनीतिकार (प्रशांत किशोर) नियुक्त करण्याची गरज भासली असेल तर यामुळे हे सिद्ध होते की, राज्यात भाजपाची वाढ होत आहे, असे शुभेंदु अधिकारी म्हणाले.

याचबरोबर, नंदीग्राममधून ममता बॅनर्जी यांच्या निवडणूक लढण्याची घोषणा केल्यानंतर शुभेंदू अधिकारी यांनीही जाहीर केले की, ममता बॅनर्जींचा पराभव केला नाही, तर राजकारण सोडून देईन. ते म्हणाले, "जर नंदीग्राममध्ये मी त्यांना (ममता बॅनर्जी) दीड लाखाहून अधिक मतांनी हरवले नाही तर मी राजकारण सोडून देईन." दरम्यान, ममता बॅनर्जी यांना भवानीपुरमधून जिंकू येऊ, असा विश्वास नाही. त्यामुळे त्या नंदीग्राममध्ये निवडणूक लढण्याचा प्रयत्न करीत आहेत. टीएमसीचे मंत्री सुरक्षित जागांचा शोध घेत आहेत. मात्र, ते कोठे जातात, यामुळे काही फरक पडत नाही, त्यांना काहीही मिळणार नाही, असे पश्चिम बंगालमधील भाजपा अध्यक्ष दिलीप घोष म्हणाले. 

ममता बॅनर्जी नंदीग्राममधून निवडणूक लढवणारआगामी विधानसभा निवडणुकीत नंदीग्राम मतदारसंघातून  निवडणूक लढणार असल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी जाहीर केले आहे. सोमवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममध्ये निवडणूक रॅली घेतली. यावेळी मला नंदीग्राममधून निवडणूक लढवायची आहे, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. ममता बॅनर्जींनी हे आवाहन स्टेट युनिटच्या अध्यक्षांना स्टेजवरच केले आणि तेथे तातडीने याबाबत निर्णय घेण्यात आला. तसेच, यंदाही राज्यात तृणमूल काँग्रेसचे सरकार स्थापन होईल. तृणमूल काँग्रेसला २०० हून अधिक जागा मिळतील, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालPoliticsराजकारणBJPभाजपाtmcठाणे महापालिकाElectionनिवडणूक