हैदराबाद : हैदराबाद महापालिकेच्या १५० जागांसाठी हाेणाऱ्या निवडणुकीचा प्रचार रविवारी संपला. सर्वच प्रमुख पक्षांनी शहरात जाेरदार शक्तिप्रदर्शन केले. विविध रॅली आणि घाेषणांनी शहर दुमदुमले हाेते. निवडणुकीत प्रमुख लढत सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समिती-एमआयएम आणि भाजपमध्ये होईल. विधानसभेप्रमाणे महापालिकेत टीआरएस पुन्हा करिश्मा दाखविणार का, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. भाजपने त्यांना कडवे आव्हान दिले आहे.
विधानसभा व लाेकसभा निवडणुकीत भाजपला इथे चंचूप्रवेश मिळाला. हे महत्त्वाचे शहर मिळ्वण्यासाठी भाजपने येथे केंद्रीय नेत्यांनाच प्रचारात उतरविले. शहरात पाकिस्तानी व रोहिंग्ये राहतात, निजामी संस्कृती बदलण्यासाठी शहराचे नाव भाग्यनगर करू, असा प्रचार केला. गृहमंत्री अमित शहा यांनी राेड शाे केला. पुढचा महापाैर भाजपचा राहणार असल्याचा दावा त्यांनी केला.
पक्षीय बलाबल (२०१६)टीआरएस ९९ एमआयएम ४४भाजप ०४ काँग्रेस ०२ एकूण जागा- १५०