बैलगाडीवरून पडल्याने खिल्ली उडवणाऱ्या भाजपा नेत्यांना भाई जगताप यांनी दिलं खरमरीत उत्तर, म्हणाले...  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 11:41 PM2021-07-10T23:41:34+5:302021-07-10T23:41:57+5:30

Bhai Jagtap gave a harsh answer to the BJP: आंदोलन करत असताना बैलगाडी मोडून सर्व नेते खाली पडल्याने विरोधी पक्ष असलेल्या भाजपाच्या नेत्यांनी दिवसभर शेलक्या शब्दात या आंदोलनाची खिल्ली उडवली. मात्र अखेरीस भाई जगताप यांनी भाजपाच्या नेत्यांना खरमरीत शब्दात प्रत्युत्तर दिले आहे.

Bhai Jagtap gave a harsh answer to the BJP leaders who mocked him for falling from a bullock cart | बैलगाडीवरून पडल्याने खिल्ली उडवणाऱ्या भाजपा नेत्यांना भाई जगताप यांनी दिलं खरमरीत उत्तर, म्हणाले...  

बैलगाडीवरून पडल्याने खिल्ली उडवणाऱ्या भाजपा नेत्यांना भाई जगताप यांनी दिलं खरमरीत उत्तर, म्हणाले...  

Next

मुंबई - इंधन दरवाढीविरोधात आज काँग्रेसने राज्याच्या विविध भागांत आंदोलन केले. मात्र मुंबईत काँग्रेसच्या नेत्यांनी केलेले आंदोलन एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आले. मुंबईमध्ये मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह अनेक नेते दरवाढी विरोधात आंदोलन करत असताना बैलगाडी मोडून सर्व नेते खाली पडल्याने विरोधी पक्ष असलेल्या भाजपाच्या नेत्यांनी दिवसभर शेलक्या शब्दात या आंदोलनाची खिल्ली उडवली. मात्र अखेरीस भाई जगताप यांनी भाजपाच्या नेत्यांना खरमरीत शब्दात प्रत्युत्तर दिले आहे. (Bhai Jagtap gave a harsh answer to the BJP leaders who mocked him for falling from a bullock cart)

मुंबई प्रदेश काँग्रेसच्या आंदोलनात बैलगाडी मोडल्याने हसणाऱ्या भाजपाच्या नेत्यांना भाई जगताप यांनी ट्विटरवरून खडेबोल सुनावले. या ट्विटमध्ये भाई जगताप म्हणतात की, माझ्या पडण्याच्या व्हिडिओसाठी उत्सुक असलेले भाजपाचे सर्व नेते जर देशाची अर्थव्यवस्था, शिक्षण, आरोग्यसेवा यासाठी तितकेच उत्सुक असते, तर आज देशाची अशी स्थिती झाली नसती, असा टोला भाई जगताप यांनी लगावला आहे.

दरम्यान, इंधन दरवाढीविरोधात आज मुंबई काँग्रेसचं आंदोलन सुरू होतं. मोदी सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. वाढत्या इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि अन्य नेते बैलगाडीवरून आंदोलनात सहभागी झाले होते. बैलगाडीवर जास्त नेते झाल्यानं ती कोसळली आणि भाई जगताप यांच्यासह सगळे नेते खाली कोसळले.

या घटनेच्या व्हिडीओवरून राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही काँग्रेसवर निशाणा साधला होता. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तुम्ही काँग्रेसच्या आंदोलनाचा व्हिडीओ लक्षपूर्वक ऐकला तर लक्षात येईल की, आंदोलनादरम्यान, नेते देश का नेता कैसा हो राहुल गांधी जैसा हो, अशा घोषणा देत होते. कदाचित राहुल गांधींना राष्ट्रीय नेता म्हटलेलं बैलांनाही आवडलेलं नसावं, त्यामुळे ती बैलगाडी मोडली, असा खोचक टोला देवेंद्र फडणवीसांनी त्या व्हिडिओवरून काँग्रेसला लगावला होता.

तर भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही काँग्रेसवर निशाणा साधला होता. तोल सांभाळा भाई जगताप. महाराष्ट्रात अभद्र आघाडी करताना राजकीय तोल गेलाच आहे. तुमचे ओझे पेलताना दोन बैलांनी अंग काढून घेतल्यावर आता सगळे काँग्रेसी कोसळलात तसे राज्याच्या राजकारणातही होईल. गाडीला कोणते दोन बैल जोडावे याचा आधीच विचार करा, असे ट्विट केशव उपाध्ये यांनी केले होते.  

Web Title: Bhai Jagtap gave a harsh answer to the BJP leaders who mocked him for falling from a bullock cart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.