...अन् भाई जगताप यांचा पारा चढला! आंदोलनावेळी थेट पोलिसालाच धक्काबुक्की

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 07:56 AM2021-06-14T07:56:46+5:302021-06-14T07:57:21+5:30

गोरेगाव येथे काँग्रेसचे आंदोलन सुरू असताना घटनास्थळी असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलकांना थांबण्याच्या सूचना केल्या. त्याला भाई जगताप यांनी हरकत घेतली.

bhai Jagtap's got angry During the agitation, he pushed the police | ...अन् भाई जगताप यांचा पारा चढला! आंदोलनावेळी थेट पोलिसालाच धक्काबुक्की

...अन् भाई जगताप यांचा पारा चढला! आंदोलनावेळी थेट पोलिसालाच धक्काबुक्की

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : इंधन दरवाढीच्या निषेधार्थ शनिवारी मुंबई काँग्रेसने शनिवारी ठिकठिकाणी आंदोलन केले. यावेळी गोरेगाव येथील आंदोलनादरम्यान मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांचा पोलिसांशी वाद झाला आणि त्यांनी उपस्थित काॅन्स्टेबलला धक्का मारल्याचा व्हिडिओ रविवारी व्हायरल झाला.

गोरेगाव येथे काँग्रेसचे आंदोलन सुरू असताना घटनास्थळी असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलकांना थांबण्याच्या सूचना केल्या. त्याला भाई जगताप यांनी हरकत घेतली. आंदोलन बंद करा, असे सांगत असाल, तर आम्ही ऐकणार नाही. आंदोलन संध्याकाळपर्यंत सुरू राहील, असे म्हणत त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. दरम्यान, एक काॅन्स्टेबल पुढे सरकत असताना जगताप यांनी त्याला मागे सारले. त्यानंतर त्यांच्यासोबतच्या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. या सर्व प्रकरणाचा व्हिडीओ रविवारी व्हायरल झाला. 

जगताप यांच्यासह ५० जणांविरुद्ध गुन्हा
nव्हायरल झालेल्या व्हिडिओत काँग्रेसकडून सुरू असलेल्या आंदोलनात भाई जगताप हेही सहभागी झाले. आंदोलनावेळी काही पोलीस घटनास्थळी येतात. आंदोलकांना सूचना देत असताना, जगताप हे पोलिसांना आरे-तुरेची भाषा वापरताना दिसतात. 
nयावेळी पोलीस आणि त्यांच्यात बाचाबाची झालेली पाहावयास मिळत आहे. तसेच एका पोलिसाला ते ढकलतानाही दिसून आले. या आंदोलनात अनेकजण विनामास्क होते. अशात कोरोना नियमांचे उल्लंघन करीत आंदोलन केल्याप्रकरणी जगताप यांच्यासह ५० कार्यकर्त्यांविरुद्ध १८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

आंदाेलकांना मागे सरकरण्याचे आवाहन!
nगोरेगाव येथील एस. व्ही. रोड परिसरात शनिवारी हे आंदोलन पार पडले. याचाच व्हायरल झालेल्या व्हिडिओत काँग्रेसकडून सुरू असलेल्या आंदोलनात भाई जगताप हेही सहभागी झाल्याचे दिसते. 
nपोलीस घटनास्थळी येतात. पोलीस आणि जगताप यांच्यात बाचाबाची झालेली पहायला मिळते. एका पोलिसाला ते ढकलताना दिसतात.
nआंदोलक पोलिसांच्या दिशेने सरकत असल्याचे लक्षात येताच जगताप यांनी त्यांनाही मागे सरकण्याचे आवाहन केल्याचेही व्हिडीओत पहायला महायला मिळते.

Web Title: bhai Jagtap's got angry During the agitation, he pushed the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.