Narayan Rane: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरुन राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. राज्यात शिवसैनिकांकडून ठिकठिकाणी राणेंविरोधात आंदोलनं केली जात आहेत. यात मुंबईत राणे समर्थक आणि युवासेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे. यात आंदोलकांना थांबवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्जही करावा लागला आहे. राणेंच्या विधानावर शिवसेनेचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनीही सडकून टीका केली आहे.
"शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सिद्धपुरूष होते. त्यांनी राणेंना शाप दिला होता. त्यामुळेच राणे काहीही बरळत आहेत", अशी टीका भास्कर जाधव यांनी केली आहे.
नेमकं काय म्हणाले भास्कर जाधव?"राणे असं का बडबडत आहेत? बाळासाहेब ठाकरे यांनी हयात असताना एका कामासाठी डॉ. जलील पारकर यांना फोन केला होता. पारकर अजून आहेत. त्यांच्या फोनवरूनच शिवसेनाप्रमुखांनी राणेंना शाप दिला होता. बाळासाहेब ठाकरे हे सिद्धपुरुष होते. ते जे बोलायचे ते जे भविष्यवाणी करायचे ती खरी व्हायची. बाळासाहेबांचं प्रत्येक वक्तव्य खरं ठरलेलं आहे. राणे केंद्रीय मंत्री होऊ द्या की आणखी काही होऊ द्या, सिद्धपुरुष बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला त्यांना शाप आहे, त्यानुसार राणेंची अधोगती सुरू आहे", असं भास्कर जाधव म्हणाले.
...तर नारायण राणेंचा 'नंगा नाच' पंतप्रधान मोदी सहन करणार नाहीत; विनायक राऊत आक्रमक
राणे कोकणाला लागलेला महाकलंक"राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र. त्यांना पुत्रं म्हणायचं की आणखी काही म्हणायचं ते तुम्ही ठरवा. हे तिघेही म्हणजे संपूर्ण कोकणाच्या संस्काराला लागलेला महाकलंक आहेत. राणे आणि त्यांच्या मुलांची वक्तव्य चुकीची आहेत. केंद्रीय मंत्री म्हणून राणेंनी असं विधान करणं शोभतं का? राणेंचं शंभर गुन्हे पूर्ण झाले आहेत. महाराष्ट्राची माती त्यांना नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही", असं इशारा भास्कर जाधव यांनी दिला आहे.