मध्य प्रदेशात भाजपाला मोठा धक्का; सिंधियांच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा धमाका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 06:55 PM2020-09-08T18:55:31+5:302020-09-08T18:59:09+5:30
पोटनिवडणुकीच्या आधी मध्य प्रदेशात जोरदार हालचाली; सिंधियाच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्याचे प्रयत्न सुरू
भोपाळ: माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी भाजपाला जोरदार धक्का दिला आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याची तयारी कमलनाथ यांनी सुरू केली आहे. २०१८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार असलेल्या सतीश सिकरवार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे. ग्वाल्हेर-चंबळमध्ये हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.
सतीश सिरकवार ग्वाल्हेरमधील मोठे नेते आहेत. ज्योतिरादित्य सिंधिया आणि त्यांच्या समर्थकांनी पक्षात प्रवेश केल्यानं ते नाराज होते. गेल्या निवडणुकीत ते काँग्रेसच्या मुन्नालाल यादव यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र त्यांचा पराभव झाला. पोटनिवडणुकीत पूर्व ग्वाल्हेरमधून भाजपनं मुन्नालाल गोयल यांनाच उमेदवारी दिली आहे. सिंधिया आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या प्रवेशामुळे भाजपमध्ये मोठी नाराजी आहे. यातील अनेक असंतुष्ट नेते सध्या काँग्रेसच्या संपर्कात आहेत.
सतीश सिकरवार यांची कौटुंबिक पार्श्वभूमी भाजपशी संबंधित आहे. त्यांचे वडील गजराज सिंह आणि भाऊ सत्यपाल सिंह भाजपचे आमदार होते. मात्र सिंधिया यांच्या भाजप प्रवेशामुळे सिकरवार नाराज झाले. सिंधियांना अधिक प्राधान्य दिलं जात असून त्यामुळे निष्ठावंतांकडे दुर्लक्ष झाल्याची सिकरवार यांची भावना आहे. सिकरवार यांच्यासारखीच स्थिती पक्षातील अनेकांची आहे. त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सध्या भाजपच्या बड्या नेत्यांकडून सुरू आहेत.
मध्य प्रदेशात लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासह त्यांचे समर्थक आमदार भाजपत गेल्यानं राज्यातील काँग्रेस सरकार कोसळलं. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या आमदारांच्या मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीवर राज्यातील सरकारचं भवितव्य अवलंबून असेल. त्यामुळेच काँग्रेसनं भाजपमधील नाराज नेत्यांवर लक्ष केंद्रीत केलं आहे.
देवेंद्र फडणवीसांना मोठा धक्का; 'जलयुक्त शिवार' अपयशी ठरल्याचा कॅगचा ठपका
'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेला सुरुवात; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा
काम करताना इगो नसावा, पण शॉर्टकटही मारू नये; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला
"राज्य इगोसाठी नाही, जनतेसाठी चालवायचं", आरे कारशेडच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा टोला