काँग्रेसमध्ये मोठ्या हालचाली; कमलनाथ तातडीने 10 जनपथवर सोनिया, प्रियांका गांधींच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 02:04 PM2021-07-15T14:04:01+5:302021-07-15T14:09:40+5:30
Kamalnath may be next Congress working President: पुढील वर्षी उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत. तिकडे पंजाबमधील वाद देखील थांबण्याची चिन्हे दिसत आहेत. यामुळे पक्षाला अध्यक्ष असला तर एकसुत्रता येईल आणि नेत्यांमध्ये देखील विश्वासाचा मेसेज जाईल असे वरिष्ठ नेत्यांना वाटत आहे.
ऐतिहासिक काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पद (Congress President) बऱ्याच काळापासून रिक्त आहे. यामुळे पक्षावर मोठी नामुष्की ओढविली आहे. राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारून अध्यक्ष पद सो़डले होते. तेव्हा पासून रिक्त असलेल्या काँग्रेस पक्षाला कार्य़कारी अध्यक्ष देण्यासाठी दिल्लीमध्ये मोठ्या हालचाली सुरु झाल्या आहेत. या पदावर मध्य प्रदेशची सत्ता गमावलेले माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Kamalnath) यांची निवड केली जाण्याची शक्यता आहे. (Kamalnath may be next Congress working President; meeting started with Sonia Gandhi, Priyanka Gandhi.)
पंजाब काँग्रेसमधील तिढा सुटला; कॅप्टन मुख्यमंत्री, सिद्धूंना मिळणार त्याहून मोठे पद: हरीश रावत
दिल्ली: कांग्रेस नेता कमलनाथ कांग्रेस की अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी से मिलने 10 जनपथ पहुंचे। pic.twitter.com/6D3YRhXNSV
— ANI_HindiNews (@AHindinews) July 15, 2021
या पार्श्वभूमीवर कमलनाथ हे 10 जनपथ येथे पोहोचले असून तिथे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि महासचिव प्रियांका गांधी उपस्थित आहेत. काँग्रेसला अध्यक्ष हवा, अशी चर्चा गेल्या काही काळापासून जोर धरू लागली आहे. यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदी एकनिष्ठ असलेले कमलनाथ असावेत असा विचार केला जात आहे. कमलनाथ यांनी ही जबाबदारी स्वीकारली तर तो एक मोठा बदल ठरणार आहे.
दिल्ली: कांग्रेस महासचिव प्रियंका गांधी वाड्रा पार्टी की अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी से मिलने 10 जनपथ पहुंचीं। pic.twitter.com/tkbPGpnUUx
— ANI_HindiNews (@AHindinews) July 15, 2021
सध्यातरी त्यांना कार्यकारी अध्यक्ष केले जाण्याची शक्यता असली तरी देखील सोनिया गांधी याद्वारे अनेक संकेत देत आहेत. लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनानंतर पक्षाचा अध्यक्ष निवडला जाणार आहे. पुढील वर्षी उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत. तिकडे पंजाबमधील वाद देखील थांबण्याची चिन्हे दिसत आहेत. यामुळे पक्षाला अध्यक्ष असला तर एकसुत्रता येईल आणि नेत्यांमध्ये देखील विश्वासाचा मेसेज जाईल असे वरिष्ठ नेत्यांना वाटत आहे.
पंजाबकाँग्रेसमध्ये (Punjab congress crisis) उठलेले राजकीय संकट शमण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. हरीश रावत यांनी यावर मोठे संकेत दिले आहेत. नवज्योत सिंग सिद्धू (navjot singh sidhu) आणि कॅप्टन अमरिंदर सिंग (captain amrinder singh) यांच्यामधील कलह दूर करण्याचा फॉर्म्युला शोधण्यात आला आहे. यानुसार कॅप्टन मुख्यमंत्री पदी कायम राहणार आहेत, तर नाराज सिद्धूंना काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बनविले जाणार आहे.