मुंबई: विधानसभा निवडणूक जवळ आल्यानं बिहारमधील राजकीय वातावरण तापलं आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासमोर सत्ता राखण्याचं आव्हान आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्रपक्ष गमावणाऱ्या भाजपच्या दृष्टीनंदेखील बिहारमधील निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. त्यातच शिवसेनेनंदेखील बिहारमधील निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. शिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेससोबत निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे. बिहारमध्ये होणार महाराष्ट्राची पुनरावृत्ती?; ओपिनियन पोलमध्ये भाजप सुस्साटबिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये काल ‘वर्षा’वरील भेटीत चर्चा झाल्याचं समजतं. त्यावर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं. 'बिहार निवडणुकीबद्दल कोणताही फॉर्म्युला अद्याप तयार झालेला नाही. तिथल्या काही लहान पक्षांना शिवसेनेसोबत काम करायचं आहे. यातले काही पक्ष जिल्हा स्तरावरचे आहेत. पप्पू यादव यांच्या पक्षानं शिवसेनेसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे,' असं राऊत यांनी सांगितलं.शिवसेना बिहारमध्ये ४० ते ५० जागा लढवेल. मात्र अद्याप तरी युतीबद्दल कोणाशीही चर्चा झालेली नाही. मी पुढील आठवड्यात पाटण्याला जाणार आहे. तेव्हा तिथल्या स्थानिक नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असं राऊत म्हणाले. भाजपला रोखण्यासाठी शिवसेना प्रयत्न करते आहे का, असा सवाल त्यांना विचारण्यात आला. त्यावर बिहारमध्ये भाजपला रोखण्याइतकी ताकद आमच्यात नाही, अशी प्रांजळ कबुली त्यांनी दिली. ‘वर्षा’वर खलबतं; पवार -ठाकरे भेटले; शिवसेना-राष्ट्रवादी बिहारमध्ये एकत्र?बिहारमध्ये नेमकं काय चित्र?बिहारमध्ये काँग्रेसने आधीच त्यांची आघाडी जाहीर केली आहे. तर मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा जदयु आणि भाजपचं जागा वाटप झालेलं आहे. मायावतींच्या बसपानं असादुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमसोबत ‘वंचित’ आघाडी उभारली आहे. शिवसेना यापूर्वीच एनडीएतून बाहेर पडली आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एकत्र येण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. पवार-ठाकरे भेटीत यावर चर्चा झाल्याचे एका नेत्यानं सांगितलं.‘जीडीएसएफ’च्या माध्यमातून ‘वंचित’चा प्रयोग; बिहारमध्ये दलित व मुस्लिम मतांचे राजकारणफडणवीस-राऊत बैठकीत काय घडलं?राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर भाजप शिवसेना एकत्र येणार अशा चर्चा सुरू झाल्या. मात्र, ती बैठक भाजपचे दोन्ही खासदार उदयनराजे भोसले आणि संभाजी राजे यांच्या संदर्भात होती. सरकारला धोका आहे असं चित्र भाजपकडून तयार केलं जात आहे. कारण त्यांना त्यांचेच आमदार टिकवून ठेवायची चिंता आहे. बिहार निवडणुकीतून आमच्या एकत्र येण्यानं त्यांना परस्पर उत्तर मिळेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.