शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
2
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
4
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
6
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
7
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
8
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
9
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
10
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
11
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
12
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
13
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
14
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
15
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
17
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
18
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
19
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
20
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया

Bihar Assembly Election Results: भाजपच्या राजकारणानं मुख्यमंत्री नितीश कुमार घायाळ; मित्रपक्षावरच भाजपचा बाण?

By कुणाल गवाणकर | Published: November 10, 2020 12:41 PM

Bihar Assembly Election Results: भाजपच्या राजकारणामुळे जेडीयू अडचणीत; बिहारमध्ये भाजप ठरणार मोठा भाऊ

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट होताना दिसत आहे. सकाळी मतमोजणीला सुरुवात होताच सुसाट सुटलेल्या महागठबंधनची आता मात्र पिछेहाट होताना दिसत आहे. जवळपास सर्वच एक्झिट पोल्सनी राज्यात राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या महागठबंधनचं सरकार येईल, असे अंदाज वर्तवले होते. मात्र हे अंदाज आता चुकीचे ठरताना दिसत आहेत. भारतीय जनता पक्ष आणि संयुक्त जनता दलानं (जेडीयू) मुसंडी मारली आहे. त्यामुळे सध्याचे आकडे पाहता बिहारमध्ये भाजप आणि जेडीयूचं सरकार येण्याची दाट शक्यता आहे.बिहारमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष, NDA बहुमताच्या पुढेमहाराष्ट्रात आधी भाजप युतीमध्ये लहान भाऊ होता. मात्र २०१४ नंतर भाजपनं शिवसेनेला मागे टाकत आपणच मोठा भाऊ असल्याचं दाखवून दिलं. बिहारमध्येही तशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. २०१५ मध्ये ७१ जागा जिंकणाऱ्या जेडीयूची यंदा पिछेहाट झाली आहे. सध्याच्या घडीला जेडीयू ४६ जागांवर पुढे आहे. तर भाजपनं ७३ जागांवर मुसंडी मारली आहे. गेल्या निवडणुकीत भाजपला ५३ जागा जिंकता आल्या होत्या. मात्र यंदा थेट ७० च्या पुढे जात भाजप राज्यातील क्रमांक एकचा पक्ष ठरताना दिसत आहे.तेजस्वी पर्व! बिहारमध्ये "मंगलराज" सुरू होईल - संजय राऊतभाजप, जेडीयू आणि लोकजनशक्ती पार्टी यांची बिहारमध्ये आघाडी होती. मात्र जागावाटपावरून लोजपानं राज्यात एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आपण मुख्यमंत्री नितीश कुमार आणि त्यांच्या जेडीयूच्या विरोधात आहोत. पण भाजपच्या विरोधात नाही, असं स्पष्ट भूमिका लोजपचे प्रमुख चिराग पासवान यांनी घेतली. एनडीएच्या बाहेर पडल्यावर त्यांनी जेडीयूच्या विरोधात दंड थोपटले. जेडीयूचे उमेदवार असलेल्या सगळ्याच जागांवर त्यांनी उमेदवार दिले. त्याचा फटका जेडीयूला बसताना दिसत आहे.जेडीयूने निकालांपूर्वीच मानली हार, प्रवक्ते के.त्यागी यांनी केले धक्कादायक विधानसध्याच्या मतमोजणीचे कल पाहता भाजपानं जेडीयूला मागे टाकलं आहे. विशेष म्हणजे लोजपनं जेडीयूच्या विरोधात भूमिका घेत असताना भाजपला आव्हान दिलं नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी भाजपचा विजय सोपा झाला. तर लोजपच्या विरोधी भूमिकेचा फटका थेट जेडीयूला बसला. नितीश कुमारच मुख्यमंत्री होणार, असं भाजप नेत्यांनी वारंवार सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील कुमारच मुख्यमंत्री असणार हे स्पष्ट केलं. मात्र जेडीयूच्या जागा कमी झाल्यानं नव्या सरकारवर भाजपचं वर्चस्व असेल. त्यांच्याकडे अनेक महत्त्वाची खाती असतील हे स्पष्ट आहे.चिराग पासवान यांनी जेडीयूविरोधात शड्डू ठोकत भाजपसाठी सोयीस्कर ठरणारी भूमिका घेतली. आपण मोदींचे हनुमान अशी स्वत:ची ओळख ते सांगत होते. त्याचा फायदा पासवान यांना फारसा होताना दिसत नाही. मात्र जेडीयूचं नुकसान करण्यात त्यांना यश मिळाल्याचं दिसत आहे. मोदींनी प्रचारसभांमध्ये राजदचे नेते आणि महागठबंधनचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांचा उल्लेख 'जंगलराज के राजकुमार' असा केला. मोदींनी वापरलेल्या या विशेषणाचा फटका राजदला बसताना दिसत आहे.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकJanta Dal Unitedजनता दल युनायटेडRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलBJPभाजपाNitish Kumarनितीश कुमारLok Janshakti Partyलोक जनशक्ती पार्टीNarendra Modiनरेंद्र मोदी